…म्हणे भुजबळ जेलात गेले, पण भाजपात गेले नाहीत

0
नाशिक | सर्वांसाठी आपले विचार प्रकट करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मिडिया होय. याठिकाणी कोण काय अकलेचे तारे तोडेल हे सांगता येत नाही. माझं सरकार मी लाभार्थी…आपले सरकार.. कामगिरी दमदार..अब की बार—– सरकार अशा अनेक शब्दांना आणि वाक्यांना अनुसरून वेगवेगळे संदेश पोस्ट होतांना दिसत आहेत.

आज असाच एक संदेश नाशिकमधील अनेक व्हॉट्स अँपच्या गृप्सवर पोस्ट होताना दिसून आला. माजी उपमुख्यमंत्री आणि येवला विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्या एकनिष्ठतेवरून हा संदेश बनवण्यात आला आहे. यात म्हटले होते की, छगन भुजबळ सारखा प्रामाणिक नेता आजवर पाहिला नाही…स्वतः जेलमध्ये गेलेत पण भाजपमध्ये गेले नाहीत! अशा आशयाचा संदेश सध्या नाशिकमधील नेटकऱ्यांच्या वॉलवर धुमाकूळ घालत आहे.

सोशल मिडीयामध्ये चालू घडामोडीवर आधारित अनेक जोक बनवले जात आहेत. सरकारची एखादी घोषणा असो व एखादे ब्रीदवाक्य असो नेटकरी त्याचे समर्थनही करतात आणि जास्तच डोक्यावरून जायला लागले कि त्याचे वाभाडेदेखील काढायला मागेपुढे बघत नाहीत.

मी लाभार्थी वरून अनेक वेगवेगळ्या पोस्ट सध्या व्हायरल झाल्या आहेत. यातून सरकाने केलेल्या कामांची पावती मिळण्याऐवजी डोकेदुखी ओढवून घेतली आहे की काय असे वाटू लागले आहे. कुणीही अनावश्यक संदेश बनवते आणि सोशल मीडियात पसरवतात. यामुळे काही अंशी सरकारची नकारात्मक प्रसिद्धीची आजच्या घडीला होताना दिसून येत आहे.

व्हॉट्स अँपवर तर आता व्हिडीओ स्टेट्सदेखील अपलोड करता येत आहेत. वेगवेगळे मोबाईल अप्पच्या माध्यमातून व्हिडीओ तयार केले जातात आणि सर्रास ते अनेकांच्या स्टेट्समध्ये पोस्ट होतात. त्यामुळे हजारो युजर्स ते बघतात आणि स्वतः पोस्ट करतात किंवा इतर ठिकाणी पाठवतात त्यामुळे अनेक वेगवेगळे व्हिडीओदेखील पोस्ट होत आहेत.

सोशल मीडियातील अशा संदेशांनी अनेकांचे इनबॉक्स सध्या फुल्ल झाले आहेत. यामुळे सरकानेदेखील याची धास्ती घेतली असून यासाठी समर्थकांकडून सकारात्मक पोस्ट अपडेट करण्याला किंवा विरोधी पक्षाचे वाभाडे काढणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करण्याला प्राधान्य दिले जाते.

यावरून अनेक ठिकाणी वेगवेगळे संघर्षदेखील पाहायला मिळतात. व्हॉट्स अँप ग्रुपमध्ये झालेली चर्चा थेट मारहाणीवर किंवा एकमेकांचे जीव घेण्यावरदेखील येते त्यामुळे सोशल मिडीयाचा अतिरेक होत असून असे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना थेट सायबर तज्ञांची मदत घ्यावी लागते आहे.

LEAVE A REPLY

*