Friday, April 26, 2024
Homeनाशिकसोशल मीडियावर अफवा पसरविणार्‍या २०० जणांना अटक; संचारबंदी उल्लंघनचे १०६० गुन्हे

सोशल मीडियावर अफवा पसरविणार्‍या २०० जणांना अटक; संचारबंदी उल्लंघनचे १०६० गुन्हे

नाशिक । प्रतिनिधी

करोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर मोठया प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहे. प्रशासनाने हा खोडसाळपणा गांभीर्याने घेतला आहे. अफवा पसरविणार्‍या २०० व्यक्तींना महागात पडले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तर, संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या १०६० जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

- Advertisement -

करोना संकट व लाॅकडाऊन परिस्थितीत सोशम मीडियावर अफवा पसरवणे, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करु नये अशी ताकीद प्रशासनाकडून देण्यात आली होती. तरी देखील मोठया प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा बहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

संचारबंदी नियमाचे उल्लंघन करणार्‍या १०६० जणांविरूध्द गुन्हे दाखल तसेच एप्रिल रोजी टिकटॉकव्दारे ‘एप्रिल फूल’ बनविणार्‍या चौघांना अटक करण्यात आली आहे.

वारंवार इशारा देऊनही जिल्ह्यात करोनाविषयी अफवा पसरवणारे व्हिडीओ व्हायरल होत असल्याची बाब सायबर सेलच्या निदर्शनास आली. पोलिसांनी गेल्या १५ दिवसांत अफवा पसरविणार्‍या २०० जणांना अटक केली.

संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण रस्त्यावर वाहन घेउन फिरणारे देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी १३७ वाहने जप्त केली आहेत. कायदयाचे उल्लंघन होईल असे कोणतेही कृत्य खपून घेतले जाणार नाही असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या