Type to search

Featured हिट-चाट

‘जय शिवाजी, जय तान्हाजी’ सोशल मीडियावर एकच जयजयकार

Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अजय देवगण ढरपहरक्षळ ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या त्याच्या आगामी चित्रपटाशी निगडीत बर्‍याच पोस्ट करत आहे. या प्रत्येक पोस्टवर नेटकर्‍यांनी उत्सफूर्तपणे दाद देण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर पोस्ट केल्यानंतर स्वराज्याप्रती प्रत्येकानेच आपल्या भावना मांडण्यास सुरुवात केली. कोणी तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सर्वांसमोर आणली तर, कोणी ‘जय शिवाजी, जय तान्हाजी’ असा नारा दिला.

प्रत्येकानेच पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या स्वराज्यासाठी योगदान देणार्‍या मावळ्यांच्या साहसाची दाद दिली. ओम राऊत दिग्दर्शित मतान्हाजी- द अनसंग वॉरियरफ या चित्रपटाच्या टीझरमध्येही अवघ्या काही सेकंदांतच अंगावर काटा उभा राहत आहे. हातात स्वराज्याचा भगवा झेंडा घेऊन त्राण आहेत तोवर शत्रूशी लढणार्‍या तान्हाजींची झलक पाहता चित्रपटाच्या ट्रेलरप्रती प्रेक्षकांची उत्सुकता व्यक्त केली आहे. फक्त चाहतेच नव्हे, तर अजय देवगनच्या या चित्रपटासाठी सिनेविश्वातही उत्सुकता आहे. अर्थात याला निमित्तंही तसंच आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!