Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सोशल मीडिया कॅम्पेनची नियमावली तयार

Share

निवडणूक आयोगाची राहणार करडी नजर

अहमदनगर (प्रतिनिधी) – आता सर्व निवडणूकांमध्ये प्रचारासाठी सोशल मीडिया कॅम्पेनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी सोशल मीडिया कॅम्पेनवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली प्रसिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरात सोशल मीडियावरील प्रचाराला आयोगाने नियमावलीत बसवले होते. आता विधानसभा निवडणुकीत आयोगाने या नियमावलीत आणखी स्पष्टता आणली आहे. सोशल मीडिया कॅम्पेनचा प्रत्येक मजकूर आता मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीच्या चाळणीतून जाणार आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेमध्ये म्हटले आहे, विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराची टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ, सिनेमा हॉल अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरील जाहिरात तसेच, सोशल मीडियावर तसेच मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून प्रसिद्ध होणारी प्रत्येक पोस्ट आयोगाच्या कमिटीला दाखवून करावी लागणार आहे. या विधानसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. यात व्हॉट्सअपसह ट्विटर, फेसबुक, इन्सटाग्रामचा वापर अधिक होणार आहे. या प्लॅटफॉर्मवरील उमेदवाराच्या अधिकृत अकाऊंटवर आयोगाची नजर असणार आहे.

अशी आहे नियमावली
निवडणूक प्रचारात इतर माध्यमांसंदर्भात लागू करण्यात येणारे सर्व कायदेशीर नियम हे सोशल मीडियावरील प्रचारालाही लागू होणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरतानाच त्यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटची माहिती द्यावी लागणार आहे. सोशल मीडियावर कोणताही मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीकडून त्याला मान्यता घ्यावी लागणार आहे. सोशल मीडियावर प्रचारासाठी करण्यात येणार्‍या खर्चाचा समावेश उमेदवाराच्या एकूण निवडणूक खर्चामध्ये गृहीत धरला जाणार आहे. इंटरनेटवर सोशल मीडिया साईट्स आणि वेबसाईट्सवर करण्यात येणारे कॅम्पेन आणि जाहिरातींसाठी वापरल्या जाणार्‍या पेमेंट मोडची माहिती कमिटीला द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर इंटरनेटवरील जाहिरातींसाठी जो कंटेंट वापरला जाईल, तो तयार करण्यासाठी लागणार्‍या खर्चाचा तपशीलही द्यावा लागणार आहे. तसेच सोशल मीडिया कॅम्पेनसाठी काम करणार्‍या टीमला देण्यात आलेल्या पगाराचा तपशीलही या खर्चाच्या यादीत राहणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!