Type to search

Breaking News आवर्जून वाचाच क्रीडा मुख्य बातम्या

संपूर्ण सोशल मीडियात विश्वचषक फिव्हर; महिलांसाठी गमतीशीर सूचना

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्वात प्रभावी माध्यम समजल्या जाणाऱ्या सोशल मीडियात आज सकाळपासून विश्वचषकाचा एक अनोखा ट्रेंड रुजताना दिसून येत आहे. या ट्रेंडने सोशल मीडियात सर्वत्र धुमाकूळ घातला असून प्रत्येकजण या गमतीशीर गोष्टी इतर ग्रुप्समध्ये शेअर करताना दिसत आहेत.

आज भारत आणि न्युजीलंड यांच्या उपांत्यफेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकून दिमाखात भारतीय संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज असून आजच्या भारतीय टीमच्या कामगिरीकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजेपासून सामन्याला सुरुवात होईल. तेव्हापासून घरातील महिलांनी सायंकाळच्या बहुचर्चित मालिका लावण्याचा आग्रह धरू नये अशा आशयाच्या काही पोस्ट सोशल मीडियात सकाळपासून झळकण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, या संपूर्ण पोस्टसचा मथळा ‘आज भारत विरुद्ध  न्युझीलंड हा उपांत्य सामना असल्याने स्त्रियांनी घ्यावयाची काळजी’ असा आहे. यामध्ये सायंकाळी आपल्या नेहमीच्या मालिका लावण्याचा आग्रह अजिबात धरु नये, अधुनमधुन पाणी व चहा आणुन द्यावा,  संघाची स्थिती वाईट असल्यास प्रार्थना करावी, संघ उत्तम स्थितीत असल्यास क्रिकेटप्रेमी म्हणून सामन्याचा आनंद घ्यावा तसेच इतरांच्या आनंदात सहभागी व्हावे,

संघ वाईट परिस्थितीतून जात असेल तर चिडचिड होणार नाही याची काळजी घ्यावी. सामना संपेपर्यंत रिमोटला अजिबात हात लाऊ नये. भारतीय टीमचाच विजय होईल असे सतत म्हणत राहावे. 

अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्याने विश्वचषकातील उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.  पुण्यातील एका महाभागाने तर भारत आणि न्युजीलंड सामन्याची कुंडली तयार करत कोण सामना जिंकणार हे जाहीर करून टाकले आहे.

याबाबतची ज्योतीव्रिद्या प्रसारक मंडळाकडून प्रसिद्ध झालेली एक पत्रिकाही सोशल मीडियात व्हायरल झाली होती. तीही अनेकांनी इतर ग्रुप्समध्ये शेअर करत आनंद घेतला.

आजच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आजच्या सामन्यात तर पावसाने व्यत्यय आणला तर उद्याचा दिवस आरक्षित ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, अनेकांनी पावसाला सोशल मीडियात विनवण्या करत पाउस पडू नये यासाठी प्रार्थनादेखील केल्या आहेत. इतर तर कामाच्या निमित्ताने बाहेर असलेल्यांना सामन्याच्या अपडेटस मिळत राहाव्यात यासाठी अनेकांनी विविध ग्रुपमध्ये ‘सामन्याच्या अपडेट कळवा’ अशा आशयाचे संदेशही अपडेट केले आहेत.

सोशल मीडियात फिरणारे गमतीशीर संदेश 

रोहितोराहुलश्चैव महेन्द्रो यष्टिरक्षक:।
गणप्रधानो कोहली हार्दिकश्च धुरंधर:॥
शमीकुमारौचपलौ बुम्राविजयकारक:।
युजवेन्द्रो यादवस्तु बलिं अर्जितुमागतौ॥
जडेजाशंकरश्चैव रिषभो कार्तिकस्तथा।जित्वाहिविश्वचषकंइतिहासोविरच्यताम्

विश्वचषक
टीम इंडियाय समर्पित. . . .


आज भारत वि.न्युझीलंड हा उपांत्य सामना असल्याने स्त्रियांनी घ्यावयाची काळजी….

१) सायंकाळी आपल्या नेहमीच्या मालिका लावण्याचा आग्रह अजिबात धरु नये…
२) अधुनमधुन पतीदेवांना पाणी व चहा आणुन द्यावा….
३) संघाची स्थिती वाईट असल्यास पतीस धीर द्यावा…
४) संघ उत्तम स्थितीत असल्यास पतीच्या आनंदात सहभागी व्हावे…
५) पती सातत्याने चिडचिड करु लागल्यास शांतता बाळगावी…
६) तुम्ही जरी घरातल्या रिमोट कंन्ट्रोल असल्या तरीही टि.व्ही चा रिमोट पतीकडेच द्यावा…
७) “भारतच जिंकेल” हे सातत्याने म्हणावे…

पोस्ट साभार : सोशल मीडिया

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!