Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

जम्मू काश्मिरमध्ये बर्फवृष्टी; वाहतूक सेवा विस्कळीत

Share

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये वातावरण बदलास सुरुवात होऊ लागली आहे. वातावरणाचा अंदाज घेऊन पर्यटकांनाही येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळे खुणावत आहेत. काश्मीरमध्ये चारही बाजूंनी बर्फाची चादर बघायला मिळत आहे.

पर्वतांवरही बर्फांची चादर पांघरलेली दिसून येत आहे. दुसरीकडे वातावरणीय बदलामुळे श्रीनगरमध्ये महामार्गावर कोंडी निर्माण झाली असल्याचे समजते आहे. प्रचंड बर्फवृष्टीमुळे अनेक झाडं उन्मळून पडली. जम्मू आणि श्रीनगरमधील संपर्क तुटला आहे. श्रीनगरच्या अनेक परिसरातमध्ये बर्फवृष्टीमुळे टेलीफोन लाइनही बंद झाल्या आहेत.

तर हिमाचल प्रदेशात सकाळपासून कुल्लू जिल्ह्यातील सोलांगमध्ये बर्फवृष्टी होत आहे. तर उत्तराखंडमध्ये वातावरण बिघडले आहे. अनेक ठिकाणी बर्फवृष्टी आणि पाऊस पडतोय. उत्तरकाशीमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे.

काश्मीर घाटात 3 महिन्यांनंतर 11 नोव्हेंबरपासून रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम होऊ शकतो. 5 ऑगस्टला केंद्र सरकारकडून कलम 370 हटवल्यानंतर बनिहाल-बारामूला रेल्वेसेवा खंडीत करण्यात आली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!