सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

0
पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील खडकवाडी येथील 55 वर्षीय महिला शेतात गवत कापत असतांना सर्पदंशाने तिचा मृत्यु झाला. या महिलेचे नाव विठाबाई रामदास नवले (वय 55, रा. खडकवाडी) असे असुन 28 जुलै रोजी तिला खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने तिच्यावर उपचार होवु शकले नाही. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याने अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
दि. 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता शेतामध्ये जनावरांना गवत कापत असतांना विठाबाई नवले यांच्या पायाला सर्पदंश झाला होता. यानंतर त्यांना खडकवाडी ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तेथे वैद्यकिय अधिकारी हजर नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार झाले नाही.
यामुळे त्यांना टाकळी ढोकेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालयात घेवून जात असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा वेळेवर उपचार न मिळाल्याने झाल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
या अगोदर पण पळशी येथील आदिवासी ठाकर समाजातील व्यक्तिचा सर्पदंश झाल्यानंतर उपचाराअभावी मृत्यु झाला होता. आता पुन्हा एकदा ही घटना घडल्याने आरोग्य यंत्रणाच्या दिरंगाईबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

LEAVE A REPLY

*