Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारगुजरात राज्यात दारुची तस्करी : साडे नऊ लाखाचे मद्य जप्त

गुजरात राज्यात दारुची तस्करी : साडे नऊ लाखाचे मद्य जप्त

नंदुरबार – 

नवापुर येथे अवैध दारु वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली असून 9 लाख 36 हजार रुपयांचे मद्य जप्त केले आहे. वाहनासह मुद्देमालाची किंमत 27 लाख 86 हजार रुपये आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तिघे फरार आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी शासनाने घेतलेल्या दारु वाहतुक व विक्रीवर बंदीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध दारु तस्करांची माहिती काढुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेते. दि.8 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री रोजी नवापुर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांद्वारे गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी विना परवाना विदेशी दारुची चोरटी वाहतुक होणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती.

त्यांनी दि.7 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपासून नवापुर ते खेकडा रोडवर झामणझर गावाजवळील खडी क्रेशर जवळ सापळा रचला. दि. 8 रोजी 2.30 वाजेच्या सुमारास नवापुरकडुन खेकडा गावाकडे गुजरात राज्यात एका पाठोपाठ 3 चारचाकी वाहने भरधाव वेगाने वेगाने येतांना दिसले. त्यांना उभे करण्यास सांगितले असता तिन्ही वाहने पुढे निघुन गेले. त्यांचा पाठलाग करुन शिताफीने वाहनांना थांबविले.

त्यांची तपासणी केली असता त्यात एमएच 39 साी1883 मध्ये 6 लाख 91 हजार 600 रुपये किमतीची जॅकपॉट बडीशेप देशी दारुचे 90 मि.ली.च्या एकुण 26,600 प्लास्टीकच्या लहान बाटल्या, जीजे 26 -2272 मध्ये 1 लाख 48 हजार 200 रुपये किमतीची जॅकपॉट बडीशेप देशी दारुचे 90 मि.ली.च्या एकुण 5700 प्लास्टीकच्या लहान बाटल्या, जीजे 15 एम-7182 मध्ये 96 हजार 200 रुपये किमतीची जॅकपॉट बडीशेप देशी दारुचे 90 मि.ली.च्या एकुण 3700 प्लास्टीकच्या लहान बाटल्या आढळल्या. वाहने लाख रुपये किंमतीची टाटा कंपनीची 709 मॉडेल, 4 लाखाची स्वीफ्ट कार, साडे चार लाख रुपये किमतीची स्वीफ्ट कार असा एकुण 27 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला.

याप्रकरणी अशोक लोटन मराठे (वय-50 रा. धखानी गल्ली, महाराष्ट्र व्यायाम शाळे जवळ, नंदुरबार), अनिल मनोहर जवंजाळ (वय-42 रा. शेफअली पार्क नवापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर अवैध देशी विदेशी दारु नवापूर येथून आणुन नवापूर व लगत असलेल्या गुजरात राज्यातील लहान लहान खेड्या गांवात विक्रीसाठी घेवुन जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उभे असलेले दोन्ही वाहन मुन्ना गामीत व्यारा गुजरात याच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली. आरोपी मुन्ना गामीत व स्वीफ्ट डिझायर वाहनातल्या दोन्ही फरार आरोपीतांविरुध्द् नवापूर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, दादाभाऊ वाघ, पोना/शांतीलाल पाटील, पोशि/जितेंद्र तोरवणे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या