Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंदा: ‘घाटे का सौदा’ करू नका – स्मृती इराणी

Share

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – देशातील भाजपचे सरकार जनतेच्या हिताचा विचार करीत आहे. राज्यात ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून ‘घाटे का सौदा’ करू नका. त्यांचे घड्याळ बंद आहे. राज्यात आणि देशात सत्ता असताना त्यांनी तिजोरी भरली, त्याच वेळी काँगेस, राष्ट्रवादीची वेळ संपली, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली.

श्रीगोंदा येथे झालेल्या सभेतत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खा. डॉ. सुजय विखे होते. इराणी म्हणाल्या, मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्यात कोण हिंदू आणि कोण मुसलमान हे त्या हल्लेखोरांना माहीत नव्हते. हल्ल्यात मरण पावले ते भारतीय होते. यावर पाकिस्तानला धडा शिकवण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार दिल्लीत हातावर हात देऊन बसले होते. या उलट काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला मोदी सरकारने बालकोटमध्ये एअर स्ट्राईक करून घेतला. तो देखील त्यांच्याच घरात घूसून.

खासदार डॉ. विखे म्हणाले, श्रीगोंदा तालुक्याचे पूर्वीचे राजकारण वैचारिक होते. आत्ताच्या काळात वैचारिकताच राहिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा नेहमी तडजोड आणि सेटिंग मधलाच असल्याने पाचपुते व नागवडे यांना मी एकत्र आणले. यात माझा कोणताही स्वार्थ नाही. राजकारण आणि अर्थकारण जोपर्यंत आपण वेगळे करत नाही, तोपर्यंत आपला विकास अशक्य आहे. महाराष्ट्राचे वाटोळे करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी साथ द्या, असे ते म्हणाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!