Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

‘एसएमबीटी’ मान्सुन लीग : सौरभ गडाख व इम्रान खान यांची दणदणीत शतके

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित 2019-20 क्रिकेट हंगामातील एस एम बीटी मान्सुन लीग स्पर्धेतील, खुल्या गटात झालेल्या सामन्यांत सौरभ गडाख व इम्रान खान यांची दणदणीत शतके आणि मोहनीश मुळे, तेजस पवार यांची उत्कृष्ट गोलंदाजी ही कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली . सदर मर्यादित षटकांचे एक दिवसीय सामने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान व महात्मा नगर क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आले.

यामध्ये पहिला सामना एन डी सी ए विरुद्ध एनएमसी यांच्यात झाला. यामध्ये एन डी सी ए ने 416 धावा केल्या. यात सौरभ गडाखच्या 128, जयेश अहेर 94, अभिजीत जाधव 51 यांच्या धावांचा मोलाचा वाटा राहिला. तर एनडीसीएच्या गोलंदाजांनी या सामन्यात मोहनिष मुळेने 7 बळी तर मीत पटेल 4 बळी टिपत एनडीसीए 364 धावांनी या सामन्यात विजयी झाली.

दुसरा सामना पंचवटी विरुद्ध क्रिसेंट मध्ये खेळवण्यात आला. यात पंचवटीने 457 धावांपर्यंत मजल मारली. इम्रान खान 181, सचिन भुजबळ 87 वि. क्रिसेंट 114 – योगेश सहस्त्रभोजने 6 बळी टिपले. या सामन्यात पंचवटी 343 धावांनी विजय झाला.

तिसरा सामना एन डी सी ए वि. एस जी सी ए बी  यांच्यात झाला. यासामन्यात 50 षटकांत एनडीसीए ने 8 बाद 265 धावा केल्या. यामध्ये अभिजीत जाधव 59 , तेजस पवार 57, प्रतिकेश धुमाळ 35, जयदीप 3 बळी टिपले. या सामन्यात एन डी सी ए चा 144 धावांनी विजय झाला.

चौथा सामना द्वारका क्रिकेट ॲकॅडमी वि. एकता क्रिकेट क्लब बी यांच्या झाला. या सामन्यात द्वारका क्रिकेट ॲकॅडमीने 210 धावा केल्या. या सामन्यात नाविन्य चोपडे 72, धनंजय ठाकूर 47 यांनी धावसंख्येला गती दिली. तर विरुद्ध टीम एकता क्रिकेट क्लब बी 204 धावांपर्यंतच मजल मारू शकली. या सामन्यात द्वारका क्रिकेट ॲकॅडमीचा 6 धावांनी विजय झाला.

पाचवा सामना नाशिक जिमखाना ए विरुद्ध एच ए एल मध्ये सामना झाला. यात नाशिक जिमखाना ए 8 बाद 120 धावापर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना अनिर्णीत राहिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!