Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक ते सातपूर प्रवास करत इलेक्ट्रीक बसची चाचणी यशस्वी

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिकेकडून शहर बससेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या अनुषंगाने इलेक्ट्रीकल बसची नुकतीच चाचणी घेण्यात आली आहे. नाशिक महापालिका ते सातपूर असा प्रवासही महापालिकेच्या एका समितीने याप्रसंगी केला. या प्रवासात ठेकेदाराच्या प्रतिनिधीने बसची माहिती दिली.

प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिका सुरू करत असलेल्या बससेवेमध्ये  जवळपास २०० पेक्षा अधिक बसेस इलेक्ट्रीक आहेत. या बसची प्राथमिक चाचणी घेण्यासाठी ठेकेदारांकडून नाशिकला बस पाठविण्यात आली होती. ओलेक्ट्रा कंपनीची ही बस असून महापालिकेच्या हिरव्या कंदीलनंतर बस लवकरच नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

सध्या ही बस पुणे येथे सुरू आहे. 9 मीटर आकाराची बस प्रदुषणमुक्त असल्याची माहिती ठेकेदाराकडून देण्यात आली आहे. डीझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बस अधिक फायदेशीर आणि परवडनारी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नाशिक महानगर परिवहन महामंडळ समितीचे पदाधिकारी आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, शहर अभियंता संजय घुगे, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, एसटी महामंडळाचे व्यवस्थापक महित,स्मार्ट सिटीचे थवील, मुख्य लेखाधिकारी गावीत, मुख्य लेखापाल सोनकांबळे, सतिश सोनवणे आदींनी या बसमधून प्रवास केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!