Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

डॉक्टर्स डे विशेष : स्मार्ट रुग्णांसाठी स्मार्ट मोबाईल अँप्स; एकदा नक्की ट्राय करून बघा

Share

स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्या वाढल्यामुळे विविध क्षेत्रात मोबाइल अ‍ॅपला मागणी आहे. वैद्यकीय क्षेत्रातही आता ऍपचा वापर वाढलेला आहे. ऍपद्वारे आपण आपल्या कॅलरीज, हृदयाची गती आणि दर दिवशी झोपण्याची सवय याबाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतो.  गरोदरपणाविषयी माहिती देणारे प्रेगनन्सी ऍप महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. प्रेगनन्सी ऍप :एम प्रेगनन्सी, प्रेगनन्सी ड्यू डेट कॅलक्यूलेटर, प्रेगनन्सी ++, माय प्रेगनन्सी टुडे इत्यादी गोष्टी अनेक सहज सोप्या गोष्टींसाठी आता रुग्ण आणि डॉक्‍टर वेगवेगळ्या ऍपचा वापर करत आहेत.

डॉक्टरांकडून होणारा वापर

 • रुग्णांना अपॉइंटमेंट देण्यासाठी
 •  रुग्णांच्या आजाराची माहिती ठेवण्याकरिता
 • औषधांच्या डोसची नोंद ठेवण्याकरिता ,
 • रुग्णांच्या रक्त तपासणी विश्‍लेषणाची नोंद ठेवण्याकरिता
 • आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या संपर्कात राहुन नवीन माहिती एकमेकांना देण्याकरिता

रुग्णांकडून होणारा वापर

 • रक्तदाब आणि पल्स रेट मोजण्यासाठी
 • डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी
 • विविध औषधांची माहिती आणि किंमत पाहण्याकरिता
 • विविध आजारांची लक्षणे पाहण्याकरिता
 • रक्तातील साखरेच्या प्रमाणाची नोंद ठेवण्याकरिता

काही लोकप्रिय ऍप 

 • बुक डॉक्‍टर्स टाइम ऍप : हे लोकप्रिय ऍप शहरातील तज्ज्ञ डॉक्‍टरांची ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठी ऍप रुग्णांना मदत करते
  डॉकसमॉप Docsapp :
 • आजच्या धावपळीच्या काळात जर हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ नसेल आणि घरी राहून तत्काळ वैद्यकीय सल्ल्याची गरज असेल तर मदत घ्या

docsapp या ऍपची . या ऍपद्वारे स्मार्टफोन वापरकर्ते घरी बसून सल्लागार सल्ला घेऊ शकतात. कोणत्याही वेळी या अॅपद्वारे अॅप वापरकर्ते सल्ला घेऊ शकतात.

कसे काम करते अॅप

या अॅपद्वारे 30 मिनिटांच्या आत वापरकर्त्याचा डॉक्टरशी संपर्क साधला जाऊन त्याला चॅट किंवा कॉलद्वारे डॉक्टरशी बोलता येईल. या अॅपद्वारे औषधे ऑर्डर करणे आणि लॅब चाचणी देखील बुक करता येते. वापरकर्त्यां पेशंटच्या समस्या जाणून घेण्यासाठी २४ तास डॉक्टर इथे उपस्थित आहेत.

स्पेशालिस्ट डॉक्टरांशी संपर्क

या अॅपद्वारे तुम्हाला जनरल फिजिशियन, गायनोकॉलॉजी, मनोचिकित्सा, गर्भधारणा, बाल तज्ञ आणि अनेक रोगांसंबंधीचे इतर डॉक्टरांशी संपर्क साधता येईल

कर्करोगासाठी ‘नाव्या’ ऍप

नाव्या’ या ऍपवर रुग्णाला सिटीस्पॅन एमआरआयसह अन्य संबंधित अहवाल अपलोड करता येऊ शकतात. कर्करोगावर उपचार करतांना एखाद्या रुग्णाला रुग्णांना ‘सेकंड ओपिनियन’ची गरज असते.

‘सेकंड ओपिनियन’ची पडताळणी करावयाची असल्यास कर्करोग तज्ञ एखाद्या रुग्णांवर उपचार करत असताना उपचारातील दुसरा पर्याय हवा असल्यास अपलोड केलेल्या केसस्टडीमधून कर्करोगतज्ञ उपचार सुचवू शकतात. या ऍपच्या सहाय्याने विविध कर्कतज्ञांमध्ये चर्चा होऊ शकते.

गोल्डन हवर सिस्टीम्स प्रा.लि.’ या कंपनीने बनविलेले आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित Ambulance.run ऍप’ :

या “ऍप’द्वारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने रुग्णसेवेचे आरक्षण करू शकतो. तसेच आपल्या जवळील रुग्णवाहिका शोधून आरक्षण करण्यासाठी आणि सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी हे “ऍप’ उपयोगात येईल.

इपिटेक टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचे मेडिमॅन’ नावाचे मोबाइल अॅप :

परगावी, परराज्यासह परदेशात कोठेही गेल्यास मेडिकल रिपोर्ट अथवा कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज नाही. कारण
‘मेडिमॅन’ या मोबाइल अॅपमुळे आता एका ‘क्लिक’वर पेशंटच्या आरोग्याचा ‘मेडिकल रिपोर्ट’ सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना पेशंटवर उपचार करणे शक्य होणार आहे.

पेशंट उपचार घेत असलेल्या अथवा यापूर्वी घेतलेल्या उपचारांचे सर्व मेडिकल रिपोर्ट फोटो काढून या अॅपवर ठेवता येणार आहेत. अॅपद्वारे तुमचे लोकेशन निश्चित झाल्यानंतर जवळच्या हॉस्पिटलची माहिती देखील मिळणार आहे.

तसेच संबंधित हॉस्पिटलने मेडिमॅन हे अॅप डाउनलोड केल्यास पेशंटने केवळ आपला अॅपचा आयडी क्रमांक सांगावा लागेल ज्यातून पेशंटची सर्व वैद्यकीय माहिती संबंधित डॉक्टरला सहज समजेल ‘ तसेच पेशंटच्या वैद्यकीय विम्याचे कागदपत्रे देखील अॅपवर अपलोड करता येणे शक्य आहे.

 • प्रा. योगेश हांडगे, पुणे
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!