आय एम बॅड गर्ल..!

0

शिक्षिकेच्या शेर्‍यावर पालकांचा संताप; चर्चेनंतर पडदा

अहमदनगर (प्रतिनिधी)– शाळेत विद्यार्थ्यांना शिस्त लावली पाहिजे यासाठी शिक्षक वेगवेगळ्या शक्कल लढवित असतात. एका शिक्षिकेने लढविलेली अशीच एक शक्कल तिच्या अंगलट आली. ही शिक्षिका एका राजकीय नेत्यांची नातेवाईक असल्याने शाळा व्यवस्थापनाने त्यावर पडदा टाकला, मात्र झालेल्या या प्रकरणाची चर्चा गावभर सुरू आहे.
कोठी रस्ता परिसरात एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेची शाळा आहे. नव्यानेच तेथे एका शिक्षिका नोकरीला लागली. ही शिक्षिका भाजपच्या एका मातब्बर नेत्याची पुतणी आहे. शाळेतील मुलांनी चांगले काही केले तर त्यांच्या चेहर्‍यावर, हातावर स्टार काढून कौतूक केले जाते. वाईट केले तर तसेही चिन्ह काढले जाते. एका मुलीने घरी होमवर्क केला नाही. या नवख्या शिक्षिकेने त्या मुलीच्या हातावर ‘आय एम बॅड गर्ल..’ असे पेनाने लिहिले. विद्यार्थीने हातावर लिहिलेले घरी पालकास दाखविले. हातावरील बॅड गर्ल लिहिल्याने पालकाचा संताप अनावर झाला. ते मुलीस घेऊन शाळेत पोहचले. तेथे स्पीकरवर संबंधित शिक्षिकेचे नाव घेऊन त्यांना पटांगणात जाब देण्यासाठी यावे अशी घोषना संतापातच दिली. माईकवरुन झालेल्या या घोषनेने ही शिक्षिका काहीवेळ भांबावली. कारण ज्या मुलीच्या हातावर लिहिले ती मुलगीही एका प्रख्यात निवेदकाची निघाली. संबंधित शिक्षिका ज्या भाजप नेत्याची भाची आहे त्याच नेत्याचा हा निवेदकही तितकाच जवळचा. त्यामुळे शाळा व्यवस्थापनही काही काळ गोंधळून गेले. पण चर्चेतून मार्ग काढत झाल्या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र या प्रकरणाची चर्चा गावभर सुरू आहे!

LEAVE A REPLY

*