Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात 60 टक्के मतदान ; मतदारांमध्ये निरुत्साह; सव्वा कोटीची रोकड जप्त; सात गुन्हे दाखल

Share

नाशिक । प्रतिनिधी

लोकशाहीचा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीचा मतदारांमध्ये जिल्ह्यात निरुत्साह पहायला मिळाला. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात एकूण 60.13 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक मतदान निफाड मतदारसंघात 73. 68 टक्के तर, नाशिक पूर्वमध्ये सर्वात कमी 47.10 टक्के इतके मतदान झाले. नाशिक मध्य मतदारसंघात सव्वा कोटीची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, जनतेचा कौल मतदान पेटीत बंद झाला असून गुरुवारी (दि.24) मतमोजणी होणार आहेे.

जिल्ह्यातील 15 मतदारंसंघात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळित व शांततेत पार पडली. मतदान केंद्रांवर मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. 15 जागांसाठी तब्बल 148 उमेदवार रिंगणात होते. सोमवारी (दि.21) सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. यावेळी काही ठिकाणी सकाळी मॉकपोल करताना काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाले होते. मात्र, हा अपवाद वगळला तर सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळित सुरु होती.

सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. त्याचा परिणाम मतदानावर पहायला झाला. सकाळच्या वेळेत मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात 5.50 टक्के मतदानाची नोंद झाली. नंतर मात्र,पाऊस थांबल्याने मतदार मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी बाहेर पडू लागले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह पहायला मिळाला. दुपारनंंतर मतदानाचा टक्का सर्वच ठिकाणी हळूहळू वाढत गेला.

जिल्ह्यातील 456 मतदान केंद्राचे वेब कास्टिंग केले जात होते. मतदान ंसंपण्यास शेवटचा अर्धातास शिल्लक असताना मात्र, अनेक मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती.यंंदा तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत निरुत्साह दिसला. त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग्य मतदानाचा हक्क बजाविण्यात पुढे होते. दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे सील करुन मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आली आहे.

मोबाईल शुटिंग केल्याने गुन्हे दाखल

जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मोबाईल शुटिंग प्रकरणी सात मतदारांवर गुन्हे दाखल झाले आहे. विंचूर, नाशिकमध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, देवळाली, मालेगाव बाह्य येथे या घटना घडल्या.

बंद पडलेली मतदान यंत्रे
कंट्रोल युनिट – 33
बॅलेट युनिट – 36
व्हिव्हिपॅट – 173

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!