Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी

जेलरोड परिसरात पतंग उडवत असताना सोळा वर्षीय मुलाचा तिसऱ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सुफीयान निजाम कुरेशी या मुलाचे नाव आहे. सुफीयान आपल्या मित्रांसोबत पतंग उडवत होता. याचवेळी तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून तोल गेल्याने सुफीयान खाली कोसळला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुफीयान नाजूक अवस्थेत होता.

परिसरातील नागरिकांनी ताबडतोब त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी जमली होती.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला जात असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!