नाशिक शहरात 16 आधार केंद्रे सुरु झाली आहेत; वाचा सविस्तर

0

नाशिक । शहरातील 13 आधार केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाल्याने ते कार्यान्वित आले आहेत. त्यामुळेच एकुण केंद्रांची संख्या आता 16 वर पोहचली आहे. केंद्र सुरू झाल्याने नाशिककरांची गैरसोय टळणार आहे. महा-ऑनलाईनने शहरात पहिल्या टप्यात 16 आधार केंद्र सुरू करण्याला मान्यता दिली होती.

त्यानुसार जिल्हा प्रशासनाने केंद्र सुरू करण्यासाठी जागा, वीज तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. मात्र, मनपाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्र सुरू करण्यात अनंत अडचणी येत होत्या. परिणामी नागरिकांनाही हालअपेष्ठा सहन कराव्या लागत होत्या. दरम्यान, नागरिकांची होणारी परवड बघता जिल्हा प्रशासनाने प्रथमत: तीन केंद्र तत्काळ सुरू केले.

त्यात जिल्हाधिकारी कार्यालयात, मनपा मुख्यालय तसेच विभागीय कार्यालयात प्रत्येकी एका केंद्राचा समावेश होता. यादरम्यान, प्रशासनाने वारंवार मनपाशी संपर्क साधत जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील मनपा शाळा तसेच विविध शासकीय विभागांमध्ये जागा उपलब्ध झाल्याने प्रशासनाने 13 केंद्र सुरू केले आहे.

यासर्व ठिकाणी आधार नोंदणी किटसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आधारसाठी नाशिककरांना करावी लागणारी वणवण काहीशी कमी होणार आहे. दरम्यान, शहराचा वाढता विस्तार बघता आणखीन 25 केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने महा-ऑनलाईनमार्फत केंद्र सरकारच्या युआयडी विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर तातडीने ही सर्व केंद्र सुरू केली जातील, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

येथेे सुरू आहेत केंद्र :

-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 2 केंद्र.
-मनपा शाळा क्रमांक 99, शिवाजी नगर, सातपुर.
-सेतू कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड.
-मनपा शाळा शॉपिंग सेंटर, आनंदवल्ली बसस्टॉप, आनंदवल्ली.
-मखमलाबाद सर्कल कार्यालय, मखमलाबाद.
-मनपा शाळा क्रमांक 65, विडी कामगार नगर, पंचवटी.
-जयदुर्गा समाज हॉल, दुर्गा नगर, क. का. वाघ महाविद्यालयामागे.
-मनपा शाळा क्रमांक 22, बि.डी. भाकेकर, विश्वास नगर, सातपूर.
-मनपा शाळा क्रमांहक 1579, चेहडी, नाशिककरोड.
-मनपा शाळा क्रमांक 34, उपविभागीय कार्यालय, नांदुर, पंचवटी.
-मनपा शाळा क्रमांक 107, टागोर नगर, महाकाली मैदानाजवळ, नविन सिडको.
-माडसांगवी सर्कल कार्यालय, माडसांगवी.
-मनपा शाळा क्रमांक 22, विश्यास नगर, सातपुर.
-मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुरोड.
-ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मुलांसाठी एक फिरते किट राखीव.

LEAVE A REPLY

*