सोग्रस येथे बालकाचा बंधार्‍यात बुडून मृत्यू

0
चांदवड – सोग्रस ता. चांदवड येथील नदीवरील बंधार्‍यात पडून येथील सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. सोग्रस येथील श्याम उर्फ कृष्णा सुखदेव माळी (वय ६) हा इतर दोन ते तिन मित्रांसमवेत सोग्रस येथील नदीवरील बंधार्‍याकडे गेला होता.

यातील काही मुले बंधार्‍यात अंघोळीसाठी उतरले त्यात कृष्णानेही बंधार्‍यात प्रवेश केला. पोहता येत नसलेल्या कृष्णाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला.

दरम्यान, बरोबरची मुले घरी निघून गेले व कृष्णाचे आईवडीलही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने सदर प्रकार उशिरा उघडकीस आला.

परीसरातील ग्रामस्थांनी तात्काळ त्यास बंधार्‍यातून काढत चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी घोषीत केले.

सायंकाळी ६ वाजता शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कृष्णाच्या पश्‍चात आई-वडिल, तीन बहिणी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*