Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जुने नाशिक : नाव दरवाजा परिसरात एकाच रात्री सहा वाडे कोसळले

Share

नाशिक  | प्रतिनिधी

गेल्या आठवडेभराच्या संततधार पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकमध्ये एकामागून एक असे पाच वाडे कोसळल्याची घटना घडली. जुन्या नाशकातील नाव दरवाजा परिसरात पाच वाडे ढासळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नसली तरी घडलेली घटना बघता येथील जुनाट वाद्यांच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काल सकाळी पाटील गल्लीतील भांगरेवाड्याचा काही भग कोसळल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळाली आहे. असे एकाच रात्री सहा वाडे कोसळले आहेत.

रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नावदरवाजा येथे अरूंद गल्लीत असलेला भालेराव वाड्याचा मोठा भाग कोसळला. पडलेल्या भींतींचा मलबा शेजारच्या वाड्यांवर पडून बोळीतील अन्य चार वाडेदेखील ढासळले.

यामध्ये कुलकर्णी, दिक्षित वाड्यांचाही समावेश असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान फायरमन श्याम राऊत, राजेंद्र पवार, उदय शिर्के, सुहास अभंग यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरूवात केली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवीतहानी झालेली नसल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!