Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील सहा पूल धोकादायक; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले डागडुजीचे आदेश

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हयातील सहा पूल वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असून त्यांची तातडीने डागडुजी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.

यंदा सर्वसाधारण मान्सून असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरुन वाहतील. परिणामी नंदी, बंधार्‍यांवरील पूल पाण्यात जाऊन नूकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुरात जीवित आणि वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली. पूर येणार्‍या ठिकाणांची माहीती ठेवा.

प्रांतधिकार्‍यांनी तहसीलदारांकडून त्या – त्या तालुक्याचे  सर्व शासकीय विभागांना एकत्रित करत एसओपी तयार करा. प्रामुख्माने नदी-नाल्यांच्या काठावरची गावे, त्यांना जोडणारे पुल आणि रस्ते पाण्यात गेल्यास किंवा जीर्ण आणि धोकेदायक पुलांची माहीती जमा करा.

त्यांची पर्यायी वाहतूकीची व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. जिल्ह्यात गिरणा, वाघाडी, दारणा, पारसह विविध नद्यांवर मिळून ब्रिटीश कालीन 9 पुल आहेत.

या पुलांची पावसाळ्यापुर्वीच स्थिती पाहून त्यावरुन वाहतुक सुरु ठेवायची की नाही ? याचा निर्णय घ्या. अन्यथा त्यांच्याकडे लक्ष ठेवा असेही आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

धोकादायक पूल

2016-17 साली जिल्हमातील 6 पुल बंद केले होते

  • चांदोरी ते सामखेडा गावास जोडणार्‍मा रस्त्मांवरील पुल
  • भगुर गावाजवळी पूल
  • घोटी गावाजवळी पूल
  • सौदाणे कळवण बोरगाव सुरगाणा उंबरठा बार्टीपाडा मा रस्त्मावरील दोन पूल
  • मनमाड गावाजळील पूल
  • नांदूर सटाणा कळवण नदीवरील पूल
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!