Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबक, सप्तश्रृंगी बस स्थानकं होणार चकाचक; प्रत्येकी तीन कोटींचा निधी मंजूर

Share
devotee can not enter at sanctum santorum at saptshrungi garh temple
नाशिक | प्रतिनिधी
राज्य सरकारकडून १९ तीर्थक्षेत्रांची बसस्थानके सुसज्ज करण्यासाठी १०३ कोटी रुपयांचा निधीला आज अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगीगड या दोन तीर्थक्षेत्रांच्या बसस्थानकांचा समावेश आहे. दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या बसस्थानकांच्या विकासासाठी प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्यामुळे नेहमीच पर्यटकांची नाराजी असलेले बसस्थानकांचा कायापालट होणार आहे. 
लवकरच या बस स्थानकांचे काम मार्गी लागणार आहे. तीर्थक्षेत्री नेहमीच सार्वजनिक वाहतुकीचा आणि सुविधांचा बोजवारा उडालेला बघायला मिळतो, यामुळे पर्यटनस्थळी पर्यटक येण्यासाठी धजावत नाहीत.
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अर्थमंत्रालयाने एक पाऊल पुढे टाकत निधीला मंजुरी दिली आहे. यातून बसस्थानकाचा कायापालट होऊन सार्वजनिक सुविधा वाढीस लागणार आहेत.
नाशिकमधील दोन्ही तीर्थक्षेत्रांना सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाले आहेत. लवकरच बसस्थानकाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!