Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शहरात आता सहा प्रतिबंधीत क्षेत्र; म्हसरुळ वृंदावननगर परिसर १० जूनपर्यंत सील

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील कोरोना विषाणू बाधीत रुग्णांचा आकडा बारा पर्यत गेला असुन अगोदर शहरात महापालिका आयुक्तांनी पाच बाधीत रुग्ण असलेल्या भागात प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केले आहे.

येत्या १० जूनपर्यंत हा परिसर सील राहील. तसेच येथील नागरिकांची आरोग्य तपासणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी शहरात गोविंदनगर जवळील मनोहरनगर, नवशा गणपती मंदिर, नाशिकरोड, सातपूर-अंबड लिंकरोड आणि समाजकल्याण कार्यालय परिसरात करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रविवारी (दि. २६) किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरात राहणारा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला.

शहरात महापालिका प्रशासनाकडुन करोना प्रादुर्भाव रोकण्यास जोरदार प्रयत्न सुरू असतांना जिल्हा शासकिय रुग्णालयात काम करीत असलेल्या एका प्रशिक्षणशर्थी डॉक्टरला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता उपचार करणारी यंत्रणेत मोठा खळबळ उडाली आहे.

संबंधीत डॉक्टर हा गेल्या तीन महिन्यापासुन शहरातील म्हसरुळ भागात असलेल्या कै. किशोर सुर्यवंशी मार्ग वृंदावननगर येथील चित्रलेखा इमारतीत आपल्या 2 ते 3 सहकार्‍यांसमोर भाड्याची खोली घेऊन राहत असल्याची माहिती पुढे आली असुन या इमारतीच्या बारा फ्लॅटपैकी चार फ्लॅट रिकामे आहेत.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी महापालिका वैद्यकिय विभागाकडुन याभागात जाऊन पाहणी केल्यानंतर आता माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. संबंधीत डॉक्टर जिल्हा रुग्णालय ते घर अशीच ये – जा करीत होते, कि अलिकडच्या काळात कोठे कोठे गेले होते, ही माहीती संकलनाचे काम सुरु झाले आहे.

संबंधीत डॉक्टर सोबत राहणार्‍या इतर काही जणांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षीत डॉक्टर राहत असलेली इमारत व परिसरात किती मीटर क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर करायचे ? यासंदर्भातील नियोजनाचे काम सायंकाळपर्यत सुरू होते. शहरात अगोदरच करोना बाधीत रुग्णांमुळे पाच प्रतिबंधीत क्षेत्र असतांना यात आणखी एका भागाची भर पडणार आहे.

हा २४ वर्षीय रुग्ण मुळचा सुरगाणा येथील असून प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून जिल्हा रुग्णालयात कार्यरत होता. जिल्हा रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण दाखल केले जातात. त्यातून त्याला संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. या अपार्टमेंटला केंद्रस्थानी मानून महापालिकेने आजूबाजूचा परिसर सील केला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी असे असतात नियम 

या क्षेत्रातील कोन्हीही घर सोडून बाहेर जाऊ अगर येऊ शकणार नाही.
बाहेरचे कोनही याठिकाणी प्रवेश करू शकणार नाही.
अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन परिस्थितीत परिसराच्या बाहेर पडता येईल.
परिसरात प्रवेश करणारे मुख्य मार्ग बंद केले जातील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!