मार्क झुकरबर्ग यांच्या बहिणीसोबत विमानात छेडछाड!

0

फेसबुक या संकेतस्थळाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची बहीण रँडी झुकरबर्गने लॉस एन्जेलिस येथे मेक्सिको फ्लाइटमध्ये त्यांच्यासोबत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे.

बुधवारी सोशल मीडियावर त्यांनी या गैरवर्तनासंदर्भातील माहिती पोस्ट केली. दरम्यान, ‘प्रवाशाकडून रँडी झुकरबर्ग यांची छेडछाड होत असताना, संबंधित विमानातील अटेंडेन्टने ही घटना रोखली नाही’,असा दावा करण्यात आला आहे. यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे स्पष्टीकरण अलास्का एअरलाईन्सने दिले आहे.

रँडी यांनी पुढे सांगितले की,’संबंधित व्यक्तीची फ्लाइट अटेंडेन्टकडेही तक्रार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय, एअरलाइन्स कर्मचा-यांकडून या घटनेला खासगी पातळीवर न घेण्याचा सल्ला देत त्यांची जागा बदलली गेली’ यावर रँडी यांनी खेद व्यक्त केला.

‘माझी छेडछाड केली जात असतानाही, मी माझी जागा सोडून दुसरीकडे का म्हणून जावं’, अशी नाराजीही रँडी यांनी पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर चौकशी सुरू असून तपासणीमध्ये संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास आरोपीच्या यात्रेसंबंधित विशेषाधिकार रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*