भावानेच केला बहिणीचा खून!

0
कर्जत (प्रतिनिधी) – भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यांचा रक्षाबंधन सणाची सर्वत्र  धामधूम सुरू असताना तालुक्यातील आंबिजळगाव येथील अलका राऊत या विवाहीतेची हत्या भाऊ, भावजयी व भाचा यांनी मिळून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी ग्रामसभेद्वारे आरोपींच्या नावाचा ठराव पोलिसांना देवून भाऊ बापु फरांडे, भावजयी विजया व भाचा नवनाथ फरांडे या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

तालुक्यातील आंबिजळगाव येथील अलका दशरथ राउत यांचा निर्घृणपणे खून करून त्यांचा मृतदेह खातगाव शिवारातील नदीजवळील बंधार्‍यात टाकण्यात आला होता. 5 ऑगष्ट रोजी मृतदेह सापडला होता. त्यानंतर मृत महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

मात्र आरोपी माहित असूनही अटक होत नसल्याने आंबिजळगाव ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून ग्रामसभेद्वारे आरोपींची नावे पोलिसांना दिले. त्यानुसार तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याप्रकरणी महिलेचे वडील जगन्नाथ फरांडे व बहिण अमृता आदलिंगे यांनी आपल्या भावना व्यक्त करत झालेल्या त्रासाचा पाढा वाचला.

भर सभेत पोलीस निरीक्षक वसंत भोये व तपासी अधिकारी शहादेव पालवे यांच्या समोर जाहीरपणे ‘मुलीचा खुन माझ्या मुलानेच केला’ असे म्हणत खुन करण्यामध्ये सहभागी असलेल्यांची नावे घेतली. त्यानंतर आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी ग्रामसभेने ठराव करून ग्रामस्थांच्या सह्यांचा ठराव पोलिसांना देण्यात आला.
पोलीस निरीक्षक वसंत भोये, पोलीस उप निरीक्षक शहादेव पालवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज लातुरकर यांनी ही कारवाई केली.

या विशेष ग्रामसभेला मुरलीधर अनारसे, माजी सभापती नानासाहेब निकत, सरपंच लोचनाबाई अनारसे, किशोर निकत, अनिल अनारसे, राहुल अनारसे, धनंजय निकत, अजित अनारसे, काकासाहेब निकत, बाळासाहेब लोंढे, पोलीस पाटील बिभीषण अनारसे आदी उपस्थित होते. जगन्नाथ फरांडे यांनी या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  एका आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न   –  या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी नवनाथ फरांडे याने ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची कुणकूण काही जणांना लागली होती. गावातील एका युवकानेे त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.

LEAVE A REPLY

*