Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Share

सिन्नर। वार्ताहर : लग्न करण्याचे आमिष दाखवून सन २०१६ पासून वेळोवेळी युवतीवर अत्याचार करणाऱ्या ३० वर्षीय विवाहित तरुणाविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब पांडुरंग नाठे (३०) रा. कुंदेवाडी याने ओळखीचा फायदा उचलत एका अल्पवयीन तरुणीशी प्रेम संबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवत व तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत सन २०१६ पासून ते मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शरीर संबंध प्रस्थापित केले. दरम्यानच्या काळात नाठे याचे लग्न देखील झाले. सदर तरुणीचे निर्वस्त्र व अश्लील फोटो मोबाईल मध्ये काढून घेऊन तिच्या बदनामीची व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन नाठे यांच्याकडून तिच्यावर बलात्कार करण्याचे प्रकार सुरुच होते.

अखेर सदर तरुणीने सिन्नर पोलीस ठाण्यात येऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. सिन्नर महाविद्यालयासमोरील साईसागर लॉज तसेच मुसळगाव एमआयडीसी हॉटेल साई प्लाझा येथे व अन्यत्र चारचाकी वाहनामध्ये नेऊन वेळोवेळी बलात्कार करण्यात आल्याचे या तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

सदर तरुणीचे वय आज रोजी २० वर्षे असले तरी नाठे याने तिला प्रेमपाशात अडकवले तेव्हा ती अल्पवयीन असल्याने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सिन्नर पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित नाठे फरार झाला आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेंद्र रसेडे तपास करीत आहेत. फरारी नाठे याला लवकरच अटक करण्यात येईल असे रसेडे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!