सिन्नरफाटा परिसरात तोफगोळा आढळल्याने घबराहट

0
नाशिकरोड | दि. २० प्रतिनिधी- येथील सिन्नरफाटा परिसरात असलेल्या मनपा रुग्णालयाच्या पाठीमागे खोदकाम करत असताना लष्कराच्या तोफगोळा आढळून आल्याने नागरिकांत खळबळ उडाली असून नाशिकरोड पोलिसांनी सदर तोफगोळा जप्त करून लष्कराच्या ताब्यातज दिला.

सिन्नरफाटा भागात महापालिकेचे रुग्णालय असून या रुग्णालयाच्या मागे असलेल्या शेतात शेतमालक खोदकाम करत असताना त्यांना लष्कराचा तोफगोळा आढळून आला.

त्यामुळे शेतमालक घाबरले व त्यांनी याबाबत नाशिकरोड पोलीसांना कळविले. त्यानंतर वपोनि पंढरीनाथ ढोकणे यांनी सहकार्‍यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन व पंचनामा करत तोफगोळा जप्त केला.

याबाबत पोलीसांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी लष्करी अधिकार्‍यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात येऊन सदर तोफगोळा ताब्यात घेतला.

सदर घटना परिसरात समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे सिन्नरफाटा परिसरातील रहिवासीयांमध्ये घबराट पसरली.

LEAVE A REPLY

*