Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वनक्षेत्रात ६ लाख तर ग्रामपंचायत क्षेत्रात २ लाख वृक्षलागवड होणार

Share

सिन्नर । वार्ताहर
आगामी पावसाळ्यात वनविभागाच्या सिन्नर प्रादेशिक कार्यालयाकडून ८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनविभागामार्फ़त वृक्षलागवड अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी चापडगाव, बोरखिंड व हिवरे येथील रोपवाटिकांमध्ये ८ लाख रोपे तयार झाली आहेत. यातून वनक्षेत्रात ६ लाख तर ग्रामपंचायत क्षेत्रात २ लाख रोपांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आला आहे.

राज्य शासनामार्फत हरित महाराष्ट्र अभियानातून पावसाळ्याच्या काळात वृक्षलागवडीची मोहीम राबवण्यात येत असते. सामाजिक संस्थाच्या मदतीने वनविभाग या मोहिमेसाठी पुढाकार घेत असून वनक्षेत्रासोबतच ग्रामपंचायत स्तरावर देखील वुक्षलागवड करून त्यांची जोपासना करण्यासाठी नियोजन करण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात वनविभागाकडून सिन्नर प्रादेशिक विभागात वृक्षलागवड अभियान राबवले जाणार असून सुमारे ८ लाख रोपे तयार देखील करण्यात आहेत. वनविभागमार्फत वनक्षेत्रात दरवर्षी वृक्षलागवड केली जाते. पावसाळ्याच्या कालावधीत लागवड केलेल्या रोपांचे दर तीन महिन्यांनी ऑडिट करण्यात येते.

वनविभागाकडून २५ हेक्टर मागे एक वनमजूर रा रोपांच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात येतो. लागवड केलेल्या रोपांपैकी अंदाजे ७० ते ८० टक्के झाडे जगतात असे गृहीत घरून उर्वरित रोपांच्या जागेवर पुढील पावसाळ्यात पुनर्लागवड करण्यात येते. ही रोपे बनवण्यासाठी चापडगाव, बोरखिंड, हिवरे येथे वनविभागाच्या रोपवाटिका असून यंदाच्या हंगामासाठी या रोपवाटिकांमध्ये उद्दिष्ठाइतकी ८ लाख रोपे तयार आहेत.

जुलै ते सप्टेंबर महिन्यांत या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या वृक्षलागवड अभियानात ग्रामपंचायतींना देखील घेण्यात असल्याने वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये २ लाख रोपे ग्रापंचायतींना वितरणासाठी तयार ठेण्यात आली आहेत. प्रती ग्रामपंचायत ३२०० रोपे वितरित केली जाणार असून पत्येक गावात ही रोपे वनविभागमार्फत पोहचवली जाणार आहेत.

वृक्षलागवडीसाठी सर्वांचे सहकार्य घेणार
वनक्षेत्रात वृक्षलागवड करतात समाजातील सर्वच घटकांचे सहकार्य जाणार आहे. दरवर्षी वृक्षलागवड मोहीम सुरु करताना लोकप्रतिनिधी, स्थानिक पातळीवर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, सरकारी कर्मचारी यांची मदत घेतली जाते. यावर्षी देखील या सर्वांसोबतच शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना देखील सामावून देऊन वृक्षलागवड मोहीम यशस्वी करण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे यांनी सांगितले.

१५ हून जातींची रोपे तयार
वनविभागाच्या चापडगाव व बोरखिंड येथील रोपवाटिकांमध्ये प्रत्येकी साडेतीन लाख तर हिवरे येथील रोपवाटिकेत एक लाख रोपे लागवडीसाठी तयार आहेत. शिसू, शिरस, रामकाठ बाभूळ, कडुलिंब, कांचन, शिवण, करंज, आवळा, रान शेवगा, बांबू , चिंच, खैर, जांभूळ आदी प्रजातीची रोपे तयार करण्यात येत असून याखेरीज वड, पिंपळ, उंबर यासारखी रोपे देखील तयार करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक वनाधिकारी इरकर यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!