Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे निधन

Share

सिन्नर l विलास पाटील

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णलयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिजित, विवाहित मुलगी असा परिवार आहे. माजी राज्यमंत्री, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, नाशिक साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या.

तालुक्यातील जायगावचे भूमिपुत्र अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सन १९८५ ते १९९९ पर्यंत सलग १५ वर्ष आमदार राहिले.

युतीच्या काळात ९५ ते ९९ राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. ऊर्जा, ग्राम विकास मंत्री. जिल्हा बँकेचे माजी संचालक, राज्य सहकारी बँकेचे विभागीयचेअरमन म्हणून त्यांनी अनेक दिवस काम केले.

शरद पवार यांच्या एस काँग्रेसच्या, पुलोदच्या काळात पहिल्यांदा ते आमदार झाले होते. त्यांनतर सलग तीन वेळा आमदार होणारे तालुक्याचे ते पहिले आमदार होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!