Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : जवान योगेश लांडगे अनंतात विलीन; लष्करी इतमामात चिंचोली येथे अंत्यसंस्कार

Share

सिन्नर | वार्ताहर 

तालुक्यातील चिंचोली येथील योगेश मनोहर लांडगे (वय 31) यांच्यावर आज लष्करी इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल (दि. १)  दुपारी गांधीनगर (गुजरात) येथे कर्तव्यावरून घराकडे परततांना दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात योगेश यांचा मृत्यू झाला होता. आज त्यांचे पार्थिव सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे सकाळी आणण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यवर अंत्यसंस्कार पार पडले.
योगेश हे मराठा लाईट इन्फंट्रीच्या गांधीनगर येथील युनिटमध्ये योगेश कार्यरत होते.  ड्युटी आटोपून घराकडे परतत असताना दुचाकीच्या झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. येथील लष्करी वसाहतीत ते आपल्या पत्नीसह वास्तव्यास होते.

त्यांच्या पश्चात पत्नी,  दोन मुले, आई -वडील, एक भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.  इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण चिंचोली येथील विद्यालयात घेतल्यानंतर त्यांनी सिन्नर महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर अकरा वर्षांपूर्वी झालेल्या लष्कराच्या भरतीत सामील होत ते देशसेवेसाठी मराठा बटालियन मध्ये रुजू झाले होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!