Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर येथील लष्करी जवानाचा गांधीनगरला अपघाती मृत्यू 

Share

सिन्नर | वार्ताहर 

तालुक्यातील चिंचोली येथील योगेश मनोहर लांडगे (वय 31) या लष्करी जवानाचा आज (दि .1)  दुपारी गांधीनगर (गुजरात) येथे कर्तव्यावरून घराकडे परततांना दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे चिंचोली गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.  योगेश यांचे पार्थिव उद्या (दि. 2) सकाळी चिंचोली गावात आणण्यात येणार असून  सकाळी 10 वाजेच्या सुमारास अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या गांधीनगर येथील युनिटमध्ये योगेश कार्यरत होते.  ड्युटी आटोपून घराकडे परतत असताना दुचाकीच्या झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
योगेश हे पत्नी व दोन लहान मुलांसह गांधीनगर येथे लष्करी वसाहतीत वास्तव्यास होते.  त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजल्यावर चिंचोली येथे नातेवाईक व मित्र परिवाराला मोठा धक्का बसला.
त्यांच्या पश्चात पत्नी,  दोन मुले, आई -वडील, एक भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.  इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण चिंचोली येथील विद्यालयात घेतल्यानंतर त्यांनी सिन्नर महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यानंतर अकरा वर्षांपूर्वी झालेल्या लष्कराच्या भरतीत सामील होत ते देशसेवेसाठी मराठा बटालियन मध्ये रुजू झालेहोते. योगेश यांच्या अपघाती मृत्यूची माहिती लष्कराच्या यंत्रणेमार्फत कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
गांधीनगर येथील सोपस्कार आटोपून पार्थिव सिन्नरच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. उद्या सकाळी दहा वाजता चिंचोली येथील अमरधाम मध्ये त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!