Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आमदार कोकाटे यांची प्रशासनाला सूचना

Share
अजित देसाई | सिन्नर
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप पिकांची अतोनात हानी झाली असून या शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत अशी सूचना  आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामा बाबत शेतकरी आशावादी असला तरी पावसाने उघडीप दिल्याने ऐन काढणीच्या काळात नुकसानीचा फटका बसला आहे. दसऱ्यानंतर पावसाने उघडीप देणे आवश्यक असताना तसे न घडल्याने हाताशी आलेली पिके पाण्यात अक्षरशः सडून गेली आहेत.
कापणी केलेले पीक  खळ्यावर वाहून आणणे शक्‍य न झाल्याने तशीच पाण्यात भिजली. बाजरी सोयाबीन मका आधी पिकांना शेतातच मोड फुटले. पश्चिम भागात  भात व भाजीपाला पिकांना ही  सततच्या पावसाने  नुकसान  पोहोचले आहे.
याशिवाय खळ्यावर साठवलेले धान्य व भुसार मालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळी उलटूनही पाऊस उघडीप घेण्याची चिन्हे नसल्याने अनेक ठीकाणी कपाशी सारख्या पिकांना देखील नुकसान पोहोचले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाईसाठी शासनाकडे अहवाल सादर करावेत अशी सूचना आमदार कोकाटे यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांना केली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!