Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश

Share

सिन्नर | प्रतिनिधी 

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे हे उद्या (दि.०२) सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे यांची आज (दि.०१) भुजबळ यांच्यासोबत आज बैठक झाली, या बैठकीनंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची माहिती समोर आली. दरम्यान, स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोकाटे यांच्या पक्षप्रवेशाबाबत विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीत नाराजीचा सुर बघायला मिळत आहे.

कोकाटे यांचा उद्या राष्ट्रवादी कार्यालयात मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. कोकाटे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात युवक कॉंग्रेस पासून केली होती. ते  युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले.

त्यानंतर कॉंग्रेसमध्येही त्यांनी पूर्णवेळ काम करून पक्ष संघटन केले. दरम्यान, शरद पवार यांनी जेव्हा कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला तेव्हा कोकाटे कॉंग्रेसमधून बाहेर पडले होते.

यानंतर सिन्नरचे तत्कालीन आमदार आणि माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नाराज झालेल्या कोकाटेंनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत आमदार म्हणून ते विधानसभेत गेले. सलग तीन पंचवार्षिक त्यांनी विजय संपादन करत लढवल्या. यात सेनेकडून सलग दोनदा तर तिसऱ्यांदा ते कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते.

नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनीही सेनेला जय महाराष्ट्र करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

त्यांनंतर कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ साली त्यांनी भाजपकडून आमदारकी लढवली. मात्र, शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला.

लोकसभेत शिवसेनेशी भाजपची युती असल्यामुळे कोकाटे यांनी शक्तीप्रदर्शन करून बंडखोरी करत अपक्ष खासदारकी लढवली. मात्र, त्यांचा शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी पराभव केला.

राष्ट्रवादी गट नाराज 

ज्या भुजबळांना लोकसभेत अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना ज्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ३१ हजार मतांची निर्णायक मते मिळवून दिली. त्याच भुजबळांनी कोकाटे यांना पक्षात घेण्याबाबत कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नाही. यामुळे सिन्नर तालुक्यातील गट नाराज असून येत्या दोन-तीन दिवसांत यात हा नाराज गट आपली निवडणुकीतील भूमिका मांडणार आहे. या गटाची बैठक दोडी येथे होणार असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!