Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नर शहरात करोनाचा शिरकाव; ८६ वर्षीय वृद्धाचा अहवाल पाॅझिटिव्ह

सिन्नर शहरात करोनाचा शिरकाव; ८६ वर्षीय वृद्धाचा अहवाल पाॅझिटिव्ह

सिन्नर ! प्रतिनिधी 

सिन्नर आज करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. ८६ वर्षीय वृद्धाचे चार दिवसांपूर्वी घशातील स्राव नमुने तपासणीला पाठवले होते. यादरम्यान, आज ही वृद्ध व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. आज रुग्ण वाढल्यामुळे सिन्नर तालुक्यातील रुग्णसंख्या आता ४ वर पोहोचली आहे.

- Advertisement -

गेल्या चार दिवसांपूर्वी वृद्धाच्या घशात द्राक्ष अडकल्याने त्यांना नाशिकच्या अशोका हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. या  व्यक्तीची प्रवासाची कुठलीही हिस्ट्री आढळून आली नाही. तसेच ही व्यक्ती मोठ्या व्यापारी कुटुंबातील.असल्याचे समजते.

रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर ग्रामीण पोलीस तसेच आरोग्य यंत्रणेकडून स्थानीक अधिकाऱ्यांच्या मदतीने सरहदवाडी रस्त्यावरील वाजे लॉन्स परिसर सील करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, 1 मे रोजी वडगाव सिन्नर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. तो पत्नीसह 4 दिवसांपूर्वी कुटुंबासह मुबईहून आला होता. त्याच्या पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्याच्या कुटुंबातील 27 सदस्यांना नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

त्यांच्या घशातील नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतून जामगाव येथील भाजीपाल्याच्या पीक अप मधून ते आले होतेजामगाव हे त्याच्या मामाचे गाव असून तेथे त्याची बहिणही दिली आहे.

तेथे तो थांबल्याचा संशय व्यक्त केला जात होता. शेजारच्या सोनारी व सोनांबे येथेही रुग्ण फिरल्याचा संशय असून वडगाव येथील आव्हाड वस्तिसह परिसर सील करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या 10 पथकांकडून परिसरात तपासणी सुरु असल्याचे समजते.

तालुक्यातील पाथरे बारेगाव येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या ३ झाली होती दरम्यान आज शहरातील वृद्धाला करोनाची बाधा झाल्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या आता ४ वर पोहोचली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या