नेहा कक्करचा’ व्हिडिओ सोशलवर व्हायरल

0
काही वेळातच लाखो लाईक
मुंबई :  प्रिया वारिअरपाठोपाठ बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिक नेहा कक्कर सध्या चर्चेत आहे. नेहा कक्करने नुकताच एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अवघ्या काही वेळात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहा कक्कर ना काही बोलत ना काही गात आहे. पण तरी देखील तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नेहा कक्कर फक्त काही इशारे करत आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी प्रिया प्रकाश ने सोशल वर आपला व्हिडीओ व्हायरल केला होता त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रिया वारिअर आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर आजही हिट आहे. याच व्हिडिओची नक्कल करताना नेहा कक्कर आपल्याला दिसत आहे. नेहाने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि अवघ्या काही तासांत या व्हिडिओला देखील अधिक पसंती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*