महेश काळे लवकरच अभिनेता म्हणून सिनेमात झळकणार!

0

कट्यार काळजात घुसली या सिनेमातून प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळेनी पार्श्वगायक म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली. याच सिनेमातील गायनासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

मात्र आता महेश काळे लवकरच रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून झळकण्याची शक्यता आहे. कट्यारच्या यशानंतर गायक म्हणून महेशनं मराठी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आता मराठी सिनेमात तो अभिनय करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाल्यास सिनेमात काम करायला आवडेल असं सांगत खुद्द महेश काळेने याचे संकेत दिले आहेत. काही ऑफर्सही आल्याचे त्याने सांगितले आहे.

पंडीत वसंतराव देशपांडे यांचा नातू म्हणजे महेश काळे. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातील खाँ साहेबांची व्यक्तीरेखा महेश काळेने साकारली आहे.

त्यामुळे अभिनयाचे क्षेत्र त्याच्यासाठी काही वेगळे नाही. आता संगीत रंगभूमीवर छाप पाडणा-या या अभिनेत्यानं मराठी सिनेमातही अभिनेता म्हणून झळकावं अशीच त्याच्या फॅन्सची इच्छा असेल.

LEAVE A REPLY

*