Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या हिट-चाट

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला

Share

मुंबई- तब्बल 28 दिवसांच्या उपचारानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. घरी आल्यानंतर त्यांनी ट्विट करून त्याची माहिती देत डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गाचं आभार मानले आहे.

लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे 12 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते.

गेल्या 28 दिवसांपासून मी न्यूमोनियाने आजारी होते. पूर्णपणे बरी झाल्याशिवाय मला डिस्चार्ज द्यायला डॉक्टर तयार नव्हते. परमेश्वर, माई आणि बाबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे मी बरी झाले असून रुग्णालयातून घरी परतले आहे. तुमच्या सर्वांचे मी आभारी आहे. माझ्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचारी वर्गाचेही मी आभारी आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असे लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!