Type to search

इंदुरीकर महाराज, बोलण्याच्या भरात बोलून गेले असतील -सिंधूताई सपकाळ

Share

कीर्तनकार इंदुरीकर यांनी सम विषम वाद भडकलेला असताना सिधुताई सपकाळ यांनी त्यांची पाठराखण करत ‘बोलण्याच्या भरात इंदुरीकर महाराज बोलून गेले असतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी  सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात इंदुरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने सर्वत्र त्यांच्यावर टीका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांवर सिंधुताई सपकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत त्या अहमदनगर मध्ये माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘इंदुरीकर हे चांगले व्यक्ती आहेत,’ ‘बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून बोललं गलं असेल. असे त्या म्हणाल्या.

दुसरीकडे राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील इंदुरीकर यांच्या कीर्तनामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल असे म्हणत त्यांची पाठराखण केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!