कोपर्डी अत्याचार प्रकरण : 26 पासून मुख्य युक्तिवाद सुरू

0

गरज पडल्यास रविवारी देखील सुनावणी; आरोपीचा वकील पुन्हा गैरहजर

अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणाची बुधवारी (दि. 11) जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुनावणी होणार होती. मात्र आरोपीचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे हे पुण्यातील वाहतुकीत अडकल्यामुळेे गैरहजर राहिले. त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही.
या कारणास्तव आता कोपर्डी खटल्याची पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. गरज पडल्यास रविवारी देखील सुनावणी घेण्यात होईल असे न्यायालयाने सुचविले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.
राज्यात बहुुचर्चित कोपर्डी खटल्याची सुनावणी दिवसेंदिवस लांबनणीवर पडत चालली आहे. या प्रकरणात न्यायालयाने पुढाकार घेत सुनावणीसाठी जवळच्या तारखा देऊन खटला तत्काळ निकाली काढावा यासाठी प्रयत्न केले. मात्र आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी अनेकदा गैरहजेरी लावून सुनावणीत अडथळे निर्माण केले.
त्यांच्या कारणांना व गैरहजेरीवर न्यायालयाने वारंवार संताप व्यक्त केला. मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे न्यायालयाने अ‍ॅड. खोपडे यांना दोन वेळा दंड केला. या नंतरदेखील गुन्ह्यात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार यांच्यासह सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना देखील आरोपीच्या वतीने साक्षीदार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या साक्षी न्यायालय फेटाळणार हे त्यांना माहीत नाही असे म्हटल्यास वावगे ठरेल. त्यासाठी उच्च न्यायालय ते सर्वेच्च न्यायालय अशा प्रकारे धाव घेऊन अखेर रवींद्र जाधव यांच्या एका साक्षीची परवानगी मिळाली. यावर सुनावणी सुरू करण्यासाठी तारीख दिली.
मात्र नेहमीप्रमाणे अ‍ॅड. निकम यांच्यासह त्यांचे साक्षीदार देखील मुंबईत अडकून पडले. त्यामुळे सुनावणीला पुढील तारीख देण्यात आली. कधी अजारी असल्याचे सांगून तर कधी सुरक्षा रक्षक नाही, किंवा वाहतुकीत अडकलो आहे. अशी कारणे सांगून सुनावणीला गैरहजेरी लावण्यात आली. असा आरोप करण्यात आला आहे.
खरे पाहता कोपर्डी खटल्याचा निकाल तत्काळ लागावा, व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी राज्यभरात 58 मोर्चे निघाले. मात्र खटल्याच्या निकालात विलंब व्हावा यासाठी आरोपीच्या वकिलांनी कोणतीही कसर सोडली नाही. असे आरोप सरकार पक्षाने केला आहे.
येणार्‍या काळात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. यावेळी विरोधी पक्ष कोपर्डी प्रकरणात सत्ताधार्‍यांना धारेवर घरण्याची शक्यता असल्याचे बोलेले जाते. त्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 13 जुलै 2016 रोजी घडलेल्या घटनेवर जलदगतीने सुनावणी सुरू आहे. सद्यस्थितीला सर्व साक्षीदार तपासून झाले असून आता अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. त्याचा केव्हा मुहूर्त निघेल यावर भाष्य न केलेलेच योग्य आहे.

चौकशीत अ‍ॅड. खोपडे दोषी  – अ‍ॅड. खोपडे यांनी यापूर्वी कोपर्डी खटल्याच्यावेळी गैरहजर राहून काही संशयास्पद कारणे दिली होती. त्यामुळे न्यायालयाने पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना चौकशी करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अ‍ॅड. खोपडे यांच्या कारणांची चौकशी केली असता पोलीस तपासात ते दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तब्बल 300 पानांचा अहवाल पोलीस अधीक्षकांनी न्यायालयात सादर केला. त्यामुळे आरोपीच्या वकिलावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*