खुशखबर : ‘सिम्बा’चा सिक्वेल येणार, रोहित शेट्टीची घोषणा

0
नवी दिल्ली : बॉक्स ऑफिसवर ‘सिम्बा’ने तुफान कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला असून 250 कोटींकडे वाटचाल सुरू आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत.

रोहितचा ‘सिम्बा’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री मिळवणारा हा त्याचा सलग आठवा चित्रपट ठरलाय. अभिनेता रणवीर सिंगनं साकारलेल्या ‘सिम्बा’च्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. त्यामुळं रोहितही भारावून गेलाय.

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सिंबा’चा जलवा कायम असून तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची रीघ कायम आहे. चित्रपटगृहांमध्ये अद्यापही ‘सिंबा’चे पोस्टर्स दिसत आहेत. त्यामुळे ‘सिंबा’चा सिक्वेल बनवण्याची घोषणा करणे थोडे घाईचे होईल. परंतु आम्ही नक्कीच 100 टक्के ‘सिंबा’-2 बनवू.

मी आताच ‘सिम्बा २’ची घोषणा केली तर सिंघम, सिम्बा आणि सू्र्यवंशी यापैकी काय बघायचं यावरून लोकांचा गोंधळ उडेल. ‘सिम्बा’ सिक्वेल शंभर टक्के येणारच आहे. पण कधी आणि कसा माहीत नाही,’ असं रोहित म्हणाला.

LEAVE A REPLY

*