Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यात्रिरश्मी लेण्यांत रोमन संस्कृतीच्या पाऊलखुणा

त्रिरश्मी लेण्यांत रोमन संस्कृतीच्या पाऊलखुणा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्राचीन काळापासून नाशिकला Nashik ऐतिहासिक असे महत्त्व आहे, सातवाहन राजवटीत नाशिक हे एक व्यापारी केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते, वेगवेगळ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा या प्राचीन अवशेषामुळे समोर येत आहेत. याच ऐतिहासिक दस्तऐवजात भर घालणारा सुमारे 2000 वर्षापूर्वीचा रोमन संस्कृतीतला खेळाचा पट येथील त्रिरश्मी लेण्यांतील Trirashmi Caves लेणी क्रमांक आठमध्ये Cave No 8 आढळून आला आहे. नाशिकच्या एच पी. टी. महाविद्यालयातील इतिहासाचे प्रा. डॉ.रामदास भोंग Prof Dr. Ramdas Bhong यांनी हा रोमन सांस्कृतिक दस्तावेज समोर आणला आहे.

- Advertisement -

डॉ.भोंग यांनी सांगितले की, प्राचीन काळापासून भारताच्या इतिहासात नाशिकचे विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील प्रथम शासक वंश म्हणजे सातवाहन राजवट या राजवटीत नाशिक हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिध्द होते.( इ.स.पूर्व दुसरे शतक ) व्यापाराच्या निमित्ताने नाशिकच्या परिसरात निवार्यासाठी थांबलेले हे रोमन व्यापारी थोडे खेळ खेळत त्यातीलच 12 खुणाचा हा खेळाचा पट असून रोम मध्ये तो लोकप्रिय होता. रोमन व्यापार्यांबरोबर तो आपसूकच भारतात आला असल्याचे डॉ.भोंग यांनी सांगितले.

या खेळाच्या पटावर बारा चौकोणाच्या जोडीत सहा चौकोणाच्या मध्ये एक कलात्मक रेषा असते.याला रोम आणि ग्रीसमध्ये पवित्र रेषा म्हणून ओळखले जाते .हा खेळ दोन खेळाडू खेळतात. या खेळाचे पुरावे ग्रीस, रोम, बोसनिय, इंग्लंड, तुर्की, आदी ठिकाणी आढळून आले आहे. महाराष्ट्रातील नागपूरजवळ भिवकुंड परिसरातील लेण्यांमध्ये असाच एक पट आढळून आला आहे. या पटात काही सूक्ष्म बदल दिसून येतात पटातील रेषा काही ठिकाणी फुलांच्या आकाराची आहे नाशिक येथे ही रेषा बाणांच्या आकाराची आढळून आली. नव्यानेच उजेडात आलेला लेणी क्रमांक आठ मधील हा पट काळाच्या ओघात अस्पष्ट झाल्याने त्यावरील मध्य रेषा दिसून येत नाही.

पटाची साधर्म्यता नाशिकच्या लेण्यांत सापडलेल्या या पटाचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवले असता या पटासारखेच साधर्म्य दर्शविणारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. जपानमध्ये सुनोरोकू, थायलँडमध्ये लेनसाकी आदी नावे या खेळाला आहेत. पटावरील रेषांची रचना: 12 चौकोणाच्या दोन ओळी व मध्यभागी एक अलंकृत रेषा जिला ग्रीस व रोमनमध्ये पवित्र रेषा म्हणून ओळखले जाते.याच रेषेपासून खेळाची सुरुवात होते.

नाशिकच्या ऐतिहासिक वैभवात भर

नाशिकच्या पुरातन आणि ऐतिहासिक वैभवात या रोमन संस्कृतीतील पटामुळे भर पडली आहे. अशीच सांकेतिक चिन्हे येथे निरीक्षण केल्यावर सापडतात. त्याचे संशोधन होणे आवश्यक आहे. इतिहास अभ्यासकांनी हे प्राचीन अवशेष पुढील पिढ्यांसाठी जतन करावेत, असे आवाहन प्रा.डॉ.रामदास भोंग यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या