श्रीरामपुरात डेंग्यूने घेतला तरुणाचा बळी
Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील वॉर्ड नं 7 मधील मोरगेवस्ती येथील काळूबाई मंदिर परिसरात राहणारा अनिल उर्फ दादू मारुती पवार (वय 32) या तरुणाचा डेंग्यूने बळी घेतला. नगर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान काल पहाटे त्याचा मृत्यू झाला.
शहरातील मोरगेवस्ती परिसरातील अनिल पवार यांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याने त्यांनी शहरात एका खासगी डॉक्टरकडे तपासण्या केल्या. डेंग्यू सदृश आजाराचे निदान झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथे पाठवण्यात आले. त्या ठिकाणाहूनही त्यांना नगर येथील नोबेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काल पहाटे पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी नोबेल हॉस्पिटलने मृत्यूचा अहवाल दिला असून त्यात अनिल पवार यांचा मृत्यू डेंग्यू आजाराने झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.
पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर पवार यांचे ते बंधू होत. काल दुपारी मयत अनिल पवार यांच्यावर श्रीरामपूर येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांपैकी काहींनी पालिकेच्या कारभाराबाबत रोष व्यक्त केला. श्रीरामपूर शहर व तालुक्यात डेंग्यु सदृश्य रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यात काल शहरातील तरुणाचा सदर आजाराने मृत्यू झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भितीचे
पालिकेच्या निष्काळजीपणाचा बळी : बिहाणी
मोरगेवस्ती भागात डेंग्यू सदृश्य आजाराचा रुग्ण आढळल्याचे या भागातील नगरसेवक म्हणून मी पालिकेचे मुख्याधिकार्यांना पाच दिवसांपूर्वी कळविले होते. परंतू पालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. केवळ नगराध्यक्षांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याने अधिकार्यांनी याबाबत उपाययोजना राबविल्या नाही, असा आरोप नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी केला आहे. तसेच पावसाळा सुरु होण्याआगोदर पासून या भागामध्ये स्वच्छता मोहिम राबवा, असे आपण पालिकेस पाच ते सहा वेळा सांगितले होते. मात्र त्याच्याकडेही दुर्लक्ष केले गेले. पालिकेच्या निष्काळजपणाचा हा बळी असल्याचा आरोप श्री. बिहाणी यांनी केला.