Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर ते अकलुज बससेवेला समांतर बस सुरू करणार्‍या अधिकार्‍याची चौकशी करा

श्रीरामपूर ते अकलुज बससेवेला समांतर बस सुरू करणार्‍या अधिकार्‍याची चौकशी करा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर ते अकलुज बससेवेला समांतर बस सुरू करून अडथळा आणणार्‍या सोलापूर एसटीच्या अधिकार्‍यांच्या निंदनीय प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी अनिल कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर बस डेपोच्यावतीने सकाळी 5.30 वा. व 11.30 वा अकलुज मुक्कामी बससेवा सुरू असून त्यास चांगला प्रतिसाद आहे. मध्यवर्ती कार्यालयाची वरील दोन्ही बससेवेला अधिकृत मंजुरी आहे. श्रीरामपूर अकलुज या मार्गावर सेवा उत्तम असल्याने प्रवाशांमध्ये लोकप्रीय आहे. आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळत आहे.

श्रीरामपूर- अकलुज बससेवा व्हावी याकरिता सोलापूर विभागीय एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अकलुज डेपो व्यवस्थापक यांना छुपा पाठिंबा देऊन नियोजन सुरू केले व या दोन्ही बसचे अगोदर येताना व जाताना अकलुज डेपोच्यावतीने नगर व शिर्डी या दोन बसेस जाणीवपूर्वक सुरू केल्या आहेत. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. यासंदर्भात प्रवासी संघटनेच्यावतीने राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुपेकर यांना निवेदन पाठवून सोलापूर विभाग अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

श्रीरामपूर-अकलुज या दोन्ही बस सेवेला अडथळा आणणार्‍या सोलापूर विभागाच्या अधिकार्‍यांच्या खुनशीपणाबद्दल प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.गोरख बारहाते, गुरुबक्ष तलरेजा, संजय माखिजा, विठ्ठल कर्डिले, पारस पाटणी, अनिता आहेर, प्रविण भंडारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अधिकार्‍यांनी त्वरीत समांतर बससेवा बंद न केल्यास अकलुज येथे जाऊन उपोषण करू असा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या