Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिर्डीत श्रीरामपूरची टोळी जेरबंद

Share

12 जण अटकेत, शिर्डी परिसरात चोरलेल्या सोन्याचीही कबुली

शिर्डी (प्रतिनिधी)- निमगाव शिवारात, हेलिपॅड रोडलगत, सप्ताह मैदान परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 12 जणांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, मिरची पूड, लाकडी दांडके, नायलॉन दोरी तसेच अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या आरोपींमध्ये श्रीरामपूरचे आठ, सोलापूरचे दोन तर पुणे व छत्तीसगडचा प्रत्येकी एकजण यांचा समावेश आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी नजीकच असलेल्या हेलिपॅडरोडवरील सप्ताह मैदान परिसरात काहीजण दरोड्याच्या तयारीत फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे, पोलीस निरीक्षक श्री. गोरे, पोलीस हवालदार इरफान शेख, पोलीस नाईक श्री पालवे, श्री. गुंजाळ, पोलीस शिपाई नितीन शेलार, अजय अंधारे, होमगार्ड श्री. जाधव, श्री. शेख या पोलीस पथकाने सरकारी गाडीतून हेलिपॅड रोड, सप्ताह मैदानच्या अलिकडे उतरले व पायी जावून एका झाडालगत काही लोकांची गर्दी दिसली.

या आरोपींना चारही बाजुंनी घेरले. यात किरण रामदास साळवे, ज्ञानेश्‍वर बाळू हासे, अक्षय दत्तात्रय भडांगे, राजू संजय साबळे, ज्ञानेश्‍वर बाळू हासे, पवन विजू जावळकर, राहुल उत्तम साळवे, मनोज संजू साबळे (हे सर्व राहणार वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर), नितीन संजय गायकवाड, विश्‍वनाथ शिवाजी जाधव (सोलापूर), टाकेश्‍वर निर्मलकर (छत्तीसगड), ढग्या सिध्दराम जाधव (पुणे) या 12 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, लाकडी दांडके, मिरचीपुड, प्लास्टीक मुठीचा चाकू, सुताची नायलॉन दोरी, स्क्रु ड्रायव्हर, व ब्लेडपान अशा प्रकारची दरोडा टाकण्याची हत्यारे पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केली.

परिसरात दरोडा टाकण्याचा हेतू असल्याचे त्यांनी त्यांच्या कबुलीत सांगितले. शिर्डी परिसरात चोरलेले सोने आमच्या व इतर सहकार्‍यांकडे असल्याचे आरोपी नितीन संजय गायकवाड याने पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी पोलीस नाइरक गयानन दशरथ वाळके यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. 748/2019 प्रमाणे वरील सर्व आरोपींविरुध्द भादंवि कलम 399, 499 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!