Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपुरात रेल्वे पोलीस ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Share

नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बेलापूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे स्टॉल सुरू ठेवण्यासाठी मासिक 4 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना रेल्वे पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. काल दुपारी नगरच्या पथकाने ही कारवाई केली. वैजनाथ पांडुरंग बडे (वय 37, पोलीस नाईक, बेलापूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र, श्रीरामपूर-मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत, औरंगाबाद जिल्हा रेल्वे पोलीस, सध्या रा. वार्ड 7, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचा बेलापूर रेल्वे स्टेशन येथे मिल्क स्टॉल आहे. सदर स्टॉल चालू देण्याकरिता मासिक हप्ता म्हणून कर्मचारी बडे याने 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही पंचासमक्ष करून तडजोडीअंती 4 हजार रुपये देण्याचे ठरले. लाचलुचपत विभागाच्या पथकाने बेलापूर रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला असता पंचासमक्ष लाच स्वीकारताना आरोपी वैजनाथ बडे मिळून आले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे, सहायक अधिकारी दीपक करांडे, पर्यवेक्षण अधिकारी हरिष खेडकर यांनी ही कारवाई केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!