Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपुरात पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन

श्रीरामपुरात पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन

श्रीरामपूर(प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर असलेल्या संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणार्‍यांना फटक्यांचा प्रसाद देणार्‍या पोलिसांमध्ये आज माणुसकीचे दर्शन घडले. रस्त्यावर आलेल्या भिकार्‍याच्या तोंडाला मास्क लावून त्याला पोलिसांकडून सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले.
संचारबंदीमुळे नगर येथून काही पोलिस बंदोबस्तासाठी येथे आले आहेत.

त्यातील बाळासाहेब कनगरे, राजू घरपडे, बहिरनाथ शेंडे, विनोद मिसाळ व निजाम शेख यांना शहरातील सिद्धीविनायक मंदिर चौकात आज बंदोबस्त होता. दुपारी अडीचच्या सुमारास मंदिराकडून एक भिकारी रस्त्यावर आला. त्याच्या तोंडाला मास्क नसल्याचे बंदोबस्तासाठी असलेल्या या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मास्क मिळवून त्या भिकार्‍याच्या तोंडाला लावला. तसेच त्याला पाहिजे त्या ठिकाणी पोहच केले.

- Advertisement -

कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने घराबाहेर पडताना मास्क लावावा, हात स्वच्छ धुवावेत, सॅनिटायजरचा अधिकाधिक वापर करकावा यासह अनेक सुचना दिल्या आहेत. शहरातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. एकीकडे या सुचनांचे उल्लंघन करणार्‍यांना पोलिससांकडून फटके दिले जात आहेत. त्याचे व्हिडिओ सोशल मिडीयावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्यातील माणुसकीही जीवंत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या