श्रीरामपूरला पासपोर्ट कार्यालयासाठी सर्वेक्षण पूर्ण

0
श्रीरामपूर येथील भारतीय डाक कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटनप्रसंगी खा. सदाशिव लोखंडे, आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पोस्ट प्रबंधक यु. एस. जनावडे आदी.

खासदार लोखंडे; श्रीरामपुरात पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन

प्रतिनिधी (श्रीरामपूर)- राज्यात नवीन पासपोर्ट कार्यालये सुरु करण्यात येणार असून त्यामध्ये श्रीरामपूरचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सरू आहेत. त्यासंबंधीचे सर्र्वेेक्षण नुकतेच झाले असून पुढील कार्यवाही देखील लवकर होईल, असे आश्‍वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले. येथील भारतीय डाक कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक पोस्ट प्रबंधक यु. एस. जनावडे, बँक व्यवस्थापक व्यंकटराव डारला, सह व्यवस्थापक स्नेहल मेश्राम उपस्थित होते. खासदार लोखंडे म्हणाले, श्रीरामपुरात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून केंद्र सरकारमार्फत बँकेच्या सर्व सेवा सुविधा नागरिकांना घरपोहोच मिळणार असून त्याबरोबरच याठिकाणी लवकरच पासपोर्ट कार्यालय सुरु करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणार आहोत.

मोदींपेक्षा कॉँग्रेस हुशार आहे. काँग्रेसने लोकांना अशिक्षित ठेवले. लोकांना शिक्षित केले नाही. लोकांच्या अंगठ्याचा वापर करीत मोदींनी पोस्टल बँकेतून सही न करता तोच अंगठा वापरुन पैसे काढण्याची सुविधा आता उपलब्ध करुन दिली आहे. पूर्वी लोक पोस्टमनची वाट बघत असत. आता सोशल मीडियामुळे मेल, एसएमएस या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पोस्ट सुविधा बंद पडण्याच्या स्थितीत होती. पण आता त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे ऊर्जितावस्था प्राप्त होऊन सर्वसामान्यांना चांगली सुविधा उपलब्ध झाली.

आमदार कांबळे म्हणाले, ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत ही सुविधा मिळणार असल्याने अशिक्षित लोकांना फक्त अंगठा देऊन पैशाची देवाणघेवाण करता येईल, तेही घरी. त्यामुळे ही योजना खर्‍या अर्थाने सेवा देणारी आहे.नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, या उपक्रमाला ‘बँक आपल्या द्वारी’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एक फोन लावल्यानंतर पोस्टल बँकेचा माणूस आपल्या दारात पैसे घेऊन येणार असल्याने सर्वसामान्यांसाठी फार चांगली सुविधा निर्माण झाली आहे. प्रास्ताविक प्रबंधक जनावडे यांनी केले. सूत्रसंचालन विजय कोल्हे यांनी केले. यावेळी भाजपाचे प्रकाश चित्ते, शिवसेनेचे अशोक थोरे, नगरसेवक रवी पाटील, राजेंद्र पवार, सुरेश भोसले उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*