श्रीरामपूर पंचायत समितीचे कामकाज उत्कृष्ट : आ. कांबळे

0

आशा स्वयंसेविकांच्या मागे खंबीरपणे उभे राहु ः पटारे

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पंचायत समितीच्या माध्यमातुन तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पदधतीने कामकाज सुरू असुन गेल्या अनेक वर्षापासुन हरेगावचा प्रश्न जाफराबाद येथील तलावाचा पाण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवण्याचे काम पंचायत समिती व सभापती दिपकराव पटारे यांच्या माध्यमातुन सुरू असल्याचे आ. भाऊसाहेब कांबळे यांनी पंचायत समितीत आयोजित आशा दिनाप्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलतांना त्यांनी व्यक्त केले.

 

यापुढे बोलतांना आमदार कांबळे म्हणाले आशा च्या माध्यमातुन आपले काम उल्लेखनीय असुन आपल्या मागण्या सोडवण्यासाठी तसेच होणार्‍या नागपूर अधिवेशना दरम्यान मी स्वःत तुमच्या बरोबर सहभागी होईल. तसेच तेथे तुमच्या राहण्याची व्यवस्था करणार असुन आशा चे काम करणार्‍या ना खुप अडचणी आहेत, मानधन अतिशय तुटपुंजे आहेत, ग्रामीण रुग्ण महिलांच्या अडचणी आशाच्या माध्यमातुन त्या महिलाना समजून घेता येतात. यापूर्वी आघाडी सरकार वेळी आम्ही आशा संदर्भात आवाज उठवला आहे, यापुढे देखील तुमचे मानधन वाढवण्यासाठी सहकार्य करणार तुमच्या माध्यमातुन गोर- गरीब रुग्णांची सेवा होत असल्याचे आमदार कांबळे म्हणाले.

 

याप्रसगी बोलतांना सभापती दिपकराव पटारे म्हणाले, स्वःतामध्ये आत्मविश्वास असेल तर कोणतेही काम अशक्य नसुन ग्रामीण भागात आरोग्याचे ज्ञान अनेक कुंटुबियाना देणे हे मोठे पुण्याचे काम आपल्या माध्यमातुन होत आहे. प्रत्येक कुटुबातील रूग्णांची विचारपुस तुमच्या आशाच्या माध्यमातुन होत असल्याने प्रत्येक कुंटूबातील तुम्ही घटक असुन तुमच्या मोर्चासाठी नागपूर ला जाण्या-येण्याची सर्व खर्च मी करणार असल्याचे सभापती पटारे यांनी सांगत ग्रामीण भागातील एखादया अज्ञानाला तुम्ही चांगल्या पदधतीने समजावता हेच मोठे भाग्य असुन तुमच्या कडून समाज हिताचे मोठे काम होत असल्याने तुम्हाला काही मदत किंबहुना अडचण असल्यास आम्ही तत्पर असल्याचे आश्वासन सभापती दिपकराव पटारे यांनी दिले.

 

 

या प्रसंगी सिद्धार्थ मुरकुटे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे, जि.प. सदस्य शरदराव नवले, उज्वला तोरणे, सौ. गोरे यांच्यासह आशा तील महिलांचे भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. मोहन शिंदे यांनी केले तर आभार व सुत्रसंचालन यांनी केले.

 

 

सभापती उचलणार आशा सेविकांचा मोर्चाचा खर्च
नागपूर येथील अधिवेशनादरम्यान होत असलेल्या आशा यांच्या विविध मागण्यासाठी होणार्‍या मोर्चासाठी सभापती दिपक पटारे हे खाण्यापिण्यासह ट्रॅव्हलची व्यवस्था करणार असल्याने उपस्थित अशा स्वंसेविकांनी आ. कांबळे व दिपक पटारे यांना धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

*