शेतीच्या प्रश्‍नावर अपयशी ठरलेल्या शासनाचा श्रीरामपूर राष्ट्रवादीच्यावतीने निषेध

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तीन वर्षांपासून सत्तेत असलेले सरकार शेती आणि शेतीच्या प्रश्‍नावर अपयशी ठरले आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार सुभाष दळवी यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलदार सुभाष दळवी यांना तहसील कचेरीवर जाऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष लकी सेठी, महिला अध्यक्ष अर्चना पानसरे, तालुकाध्यक्ष सुरेश ताके, शहर युवक अध्यक्ष योगेश जाधव, तालुका युवक अध्यक्ष गणेश ठाणगे आदी उपस्थित होते.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, लहान व्यावसायिक, शिक्षक व डॉक्टर अशा सर्वच थरांमध्ये शासनाबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जनतेला होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात शेती आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न, कर्जबाजारी राज्य, वीज समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग व रोजगारात झालेली घसरण आदी समस्या नमूद करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*