श्रीरामपुरात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मोर्चा

0
महागाईच्या निषेधार्थ तहसीलदार सुभाष दळवी यांना निवेदन देताना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते.

करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकार्‍यांच्यावतीने तहसीलदार सुभाष दळवी यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, महागाईच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष माजी खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर भारत बंद आंदोलन चालू आहे. भाजप सरकारने अर्थव्यवस्थेवर लक्ष न देता भांडवलदारांसाठी घेतलेल्या धोरणामुळे इंधनाचे दर भयंकर वाढले आहे. तरी येत्या काळात पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक बाबींचे दर कमी न झाल्यास नागरिकांमध्ये उद्रेक होईल.

निवेदनावर उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुळा प्रवराचे उपाध्यक्ष जी. के. पाटील, बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, पक्षप्रतोद संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुक्तारभाई शहा, मनोज लबडे, मुजफ्फर शेख, नगरसेविका मीराताई रोटे, चंद्रकलाताई डोळस, भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई दिघे, मंगलताई पवार, पं.स. सदस्या डॉ. वंदनाताई मुरकुटे, संगीताताई शिंदे, अरुण नाईक, विजय शिंदे, भाऊसाहेब डोळस, संजय छल्लारे, कॉ. पांडुरंग शिंदे, कय्युम पठाण, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, मुरलीधर राऊत, अण्णासाहेब डावखर, समीर बागवान, दिलीप अंकुशे, जावेदभाई शेख, मुन्ना पठाण, रवि दाभाडे, शहारुख शेख, दीपक कदम, रवींद्र सूर्यवंशी, अनिल इंगळे, गणेश वाघ, मनिष पंचमुख, बाळासाहेब राऊत, किशोर परदेशी, गणेश म्हस्के, रितेश चव्हाणके, सुनील शिंदे, राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये, सुनील शिरसाठ, सुभाष तोरणे, चिमाजी राऊत, प्रताप देवरे, प्रेमचंद कुंकूलोळ, तेजस बोरावके, सनी सानप, गोपाल लिंगायत, किरण परदेशी, युनूस पटेल, संभाजी देवकर, दीपक पोटफाडे, विकास पठारे, चंद्रकांत खरात, निलेश बोरावके, दिलीप विळस्कर, भरत जगदाळे, डॉ. राजेंद्र लोंढे, दिनेश तरटे, बाळासाहेब विघे, रियाज पोपटिया, सोमनाथ तुपसाखरे, संतोष देसाई, जफर शहा, रितेश एडके, युवराज फंड, कृष्णा पुंड, संजय अग्रवाल, दिनकर पवार, भागवत राऊत, अमोल शेटे, पंजाबराव भोसले, प्रविण वाघ, दीपक देसले, नरेंद्र कुर्‍हे, चरण त्रिभूवन, प्रशांत डावखर, शफी शहा, योगेश गायकवाड, राजेंद्र भोसले, सृजन कदम, सागर दुपाटी आदींच्या सह्या आहेत.

आ. कांबळे, पटारे, आदिक व मनसेकडूनही शासनाचा निषेध

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यावतीने श्रीरामपूर तालुक्यात व शहरात पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये काँग्रेस पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आदींसह अनेक सामाजिक व राजकीय संघटना सहभागी होऊन शासनाच्या जनहितविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला. महात्मा गांधी पुतळा येथून मोर्चा मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोड, कॉलेज रोड, तहसीलदार कचेरी अशा मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. दरम्यान उघडे असलेल्या दुकानात जाऊन विनंती करण्यात आली व मोर्चात सहभागी करून घेण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पं.स. सभापती दीपकराव पटारे, नगरसेवक प्रकाश ढोकणे, अ‍ॅड संतोष कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, ख.वि.संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब बांद्रे, पांडुरंग शिंदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींनी आपल्या भाषणात सरकारच्या धोरणाचा निषेध केला. तसेच निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक सुभाष गांगड, शामलिंग शिंदे, कलिमभाई कुरेशी, ताराचंद रणदिवे, राजेंद्र पवार, जयश्री शेळके, केतन खोरे, रईस जहागिरदार, विजय शेळके, आदित्य आदिक, जयंत चौधरी, युवक काँग्रेसचे संचित गिरमे, रोहित शिंदे, शंतनू फोपसे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अशोकराव बागुल, असलमभाई सय्यद, योगेश जाधव, बाजार समितीचे संचालक राधाकृष्ण आहेर, निवृत्ती बडाख, खैरीचे सरपंच शिवाजी शेजुळ, बाबासाहेब कोळसे, मनसेचे डॉ. नवथर, निरंजन भोसले, सोयल शेख, किशोर शिंदे, अमोल पटारे, महेंद्र पटारे, हर्षल दांगट, कैलास पंडित, पत्रकार प्रदीप आहेर, लक्ष्मण जाधव, गणेश ठाणगे, विजय निकम, शंकरराव चव्हाण, अनिरुद्ध भंगारवाला, गुरुचरण भाटियाणी, तुषार बोबडे, रामदास पिलगर, लखन कडवे, अंबादास कोकाटे, रोहित जोंजाळ, गणेश दिवटे, बाळासाहेब घोडे, एस. के. खान, विलास ठोंबरे, दिलीप त्रिभुवन, सुधाकर बोंबले, सुमित मुथा, नारायण कणसे, नानासाहेब तुपे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*