Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपुरात टँकरखाली सापडून एकजण ठार

Share

श्रीरामपूर : शहरातील शिवाजी चौकात भिषण अपघातात सुनील ड्रायक्लिनर्सचे मालक सुनिल एकनाथ आदमाने (वय अंदाजे -४८) यांचा मृत्यू आला .

रविवारी काळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकात हा अपघात झाला . सुनील आदमाने हे पायी जात असताना दुधाच्या टँकरने त्यांना धडक दिली .

टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. या चौकात नेहमी वर्दळ असते . त्यामुळे अपघात नेहमी घडतात . या ठिकाणी बसविलेले सिंगल नेहमी बंद असतात . वाहतूक पोलिसही कधीतरी दिसतो . अशा घटना टाळण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!