Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच जळगाव

जळगाव रथोत्सवाला १४७ वर्षांची परंपरा

Share

जळगाव –

येथील श्रीराम रथोत्सवाला १४७ वर्षांची परंपरा असून संत अप्पा महाराज यांनी सन १८७२ मध्ये १८ पगड जातींना एकत्र करून या रथोत्सवाचा प्रारंभ केला. आज या रथोत्सवास १४७ वर्षे होत आहेत. असंख्य भाविकांच्या सहकार्याने रथोत्सवाचा नंदादीप अखंड तेवत आहे.

 

साग व तिवसाच्या लाकडापासून साकारलाय रथ

सन १८७२ मध्ये सुरू झालेला हा रथ साग व तिवसाच्या सुमारे २३० मण लाकडापासून कलाकुसरीतून अथक परिश्रमाने साकारला आहे. रथाचे लाकूड चकाकत रहावे म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जाते.

रथोत्सवा निमित्त आज जळगाव शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

रस्ते झाले कॉक्रीटचे

पुर्वी मातीच्या रस्त्यांवरून रथ उत्साहात ओढला जात होता. रथोत्सव मार्गावर सडा समार्जन केले जात होते. रथाच्या पुढे कोऱ्या तांब्याच्या घागरीने महिला वर्ग रथ मार्गावर पाणी टाकत होते, ते पाणी मातीच्या रस्त्यांमळे मुरून जायचे.

मात्र आता सर्वत्र कॉक्रीटचे रस्ते झाले असल्याने सडा समार्जन हा प्रकार बंद झाला असून गेरूच्या सहाय्याने रंगवून त्यावर रांगोळी काढली जाते. तर या मार्गावर पाणी टाकल्यास त्यावरून पाय निसटण्याची शक्यता असते.

जुन्या गावातच फिरायचा रथ

पुर्वी हा रथ फक्त जुन्या गावातच फिरत असे. त्यामुळे हा रथ दुपारी १२ ला निघालेला रथ सायंकाळ पर्यंत श्रीराम मंदिरात परत येत होता. रात्री मशाल, पणत्या लावल्या जात होत्या. शहराचा वाढलेला विस्तार व रथोत्सवात कालानुरूप बदल झाला आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेला रथोत्सवाची सांगता

जळगाव श्रीराम रथोत्सव १५ दिवसांच्या दिपोत्सव, आनंदोत्सव साजरा करत त्रिपुरारी पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते.

प्राणिमात्रांचे ऋण

रथोत्सव काळात रोज नवनवीन वहन निघत असतात. या वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात. भारतीय संस्कृतीमध्ये मानव जातीसोबत प्राणिमात्रांचेही ऋण मानले जाते. त्याचे प्रतीक म्हणून यात घोडा, हत्ती, सिंह, मोर, शेषनाग, सरस्वती, चंद्र, सूर्य, गरूड, मारूती अशी वहने निघत असतात.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!